Home > 'नरेंद्र मोदींचा राजकीय सूडभावनेतून महाराष्ट्रावर दरोडा'

'नरेंद्र मोदींचा राजकीय सूडभावनेतून महाराष्ट्रावर दरोडा'

नरेंद्र मोदींचा राजकीय सूडभावनेतून महाराष्ट्रावर दरोडा
X

आंतरराष्ट्रीय सेवा केंद्राचं मुख्यालय (IFSC) मुंबईऐवजी गुजरातच्या गांधीनगर येथे स्थापित करण्याच्या निर्णयावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असतानाही केवळ राजकीय वैमनस्यातून IFSC गुजरातला स्थलांतरीत केल्याची टीका केंद्र सरकारवर केली जातेय. महिला व बालविकास कल्याणमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजकीय सूडभावनेतून महाराष्ट्रावर दरोडा घातल्याची घणाघाती टीका केली आहे.

हे ही वाचा..

बता दें कि केंद्र सरकार ने 27 अप्रैल को जारी अपनी अधिसूचना में साफ कर दिया है कि आईएफएससी अथॉरिटी का मुख्यालय गुजरात की राजधानी गांधीनगर में ही बनेगा। गांधीनगर में ही प्रधानमंत्री की ड्रीम परियोजना गुजरात इंटरनेशनल फाइनांस-टेक सिटी (गिफ्ट) भी आकार ले रही है। आईएफएससी के मुख्यालय को लेकर गुजरात और महाराष्ट्र में लंबे समय से खींचतान चल रही थी।

केंद्र सरकारने २७ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय सेवा केंद्राचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगर येथे स्थापित करणार असल्याचे आदेश जाहिर केले. गांधीनगर मध्ये पंतप्रधान मोदी यांचा गुजरात इंटरनेशनल फाइनांस-टेक सिटी (गिफ्ट) हा ड्रिम प्रोजेक्ट आकारास येत आहे. त्यानिमित्ताने IFSC मुख्यालय स्थापन करण्यावरुन महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात बऱ्याच कालावधीपासून चढाओढ सुरु होती.

सोबतच, महाराष्ट्र आणि गुजरातचा राजकीय आणि आर्थिक इतिहास पाहता देशाची आर्थिक केंद्रसत्ता बनन्यासाठीची गुजरातची महत्त्वकांक्षा जगजाहीर आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे.

याच भावनेतून यशोमती ठाकूर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना “आयएफएससीला मुंबईहून गुजरातमध्ये हलविणे म्हणजे मोदी सरकारची महाराष्ट्राविरूद्ध असलेली वैमनस्याची भावना दिसून येते. पंतप्रधान मोदी अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागतायत. राजकीय सूडभावनेतून महाराष्ठ्रावर पुन्हा दरोडा घातला आहे.” अशी भावना व्यक्त केली आहे.

Updated : 3 May 2020 3:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top