Home > Political > 'अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत' - मंत्री यशोमती ठाकूर

'अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत' - मंत्री यशोमती ठाकूर

अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत  - मंत्री यशोमती ठाकूर
X

सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल याच बरोबर भाज्यांचे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत. मागील काही दिवसांपासून ही महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली आहे. घरगुती सिलेंडरच्या दारात प्रचंड वाढ झाली आहे. या सगळ्या महागाई वरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी "महागाई वाढवणारं सरकार केंद्रात सत्तेत आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय? अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनीच 'महागाईचे दिन' आणले असं म्हणत मोदी सरकारवर उपरोधिक पद्धतीने टीका केलीये.

'सगळं काही महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत. यावर मी काय बोलू? महागाई वाढवणारं सरकार केंद्रात सत्तेत आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळं काही महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत. यावर मी काय बोलू? सिलेंडरचे भाव यासाठी वाढलेत कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलाचे भाव यासाठी वाढले आहेत कारण लोकांचं आरोग्य व्यवस्थित रहावं. डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढलेत की करोना काळात लोकांनी बाहेर पडू नये. अशी स्पष्टीकरणं केंद्र देणार असेल तर यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल' असं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हंटल आहे.

Updated : 22 Oct 2021 5:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top