Home > Political > विचारधारेशी तडजोड करुन मिळणार मुख्यमंत्री पद ही नको असं का म्हणाल्या मंत्री यशोमती ठाकूर

विचारधारेशी तडजोड करुन मिळणार मुख्यमंत्री पद ही नको असं का म्हणाल्या मंत्री यशोमती ठाकूर

आमदार श्वेता महाले यांनी एका कार्यक्रमात यशोमती ठाकूर या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील पण भाजपमधून असं म्हंटल व त्यानंतर मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा आहे..

विचारधारेशी तडजोड करुन मिळणार मुख्यमंत्री पद ही नको असं का म्हणाल्या मंत्री यशोमती ठाकूर
X

झी मराठी वाहिनीवरील 'किचन कलाकार' या मालिकेत आपल्याला वारंवार राजकीय क्षेत्रातील अनेक नेते मंडळी सहभागी होताना पाहायला मिळत असतात. या मालिकेत सहभागी झालेल्या कलाकारांना काही टास्क दिल्या जातात आणि त्या पूर्ण करताना त्या सर्वांची होणारी धडपड, धावाधाव हे सर्व अत्यंत मनोरंजक असतं. किचन कलाकार या मालिकेचा कालचा भाग देखील अशाच प्रकारे अत्यंत रंजक होता. कालच्या भागात महिला व बालकल्याण मंत्री Adv. यशोमती ठाकूर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले या उपस्थित होत्या.

कालच्या किचन कलाकाराच्या भगत घडलेल्या धमाल व मज्जा-मस्ती मध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेता महाले यांना दिलेलं एक उत्तर देखील सध्या चर्चेत आहे. तर झालं असं होतं की, आमदार श्वेता महाले यांना एक फोटो दाखवण्यात आला. तो फोटो होता मंत्री यशोमती ठाकूर यांचा आणि फोटो दाखवल्यानंतर त्यांना त्यांच्या विषयीचे मत सांगण्यास सांगितले. त्यावेळी श्वेता महाले यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिलं की, राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री परंतु भाजप मध्येयेऊन.. असे व्यक्तव्य केल्यानंतर मंत्री यशोमती ठाकूर यांनी हसत डोक्यावरती हात मारून घेतला. आणि त्यानंतर सूत्रसंचालकाने मंत्री यशोमती ठाकूर यांना महाले यांनी दिलेल्या उत्तरावर बोलण्याची विनंती केली.

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, श्वेता महाले या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत. माझ्याबद्दल एवढं चांगलं चिंतते, माझं चांगलं व्हावं असं त्यांना नेहमी वाटतं पण मला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल पण विचारधारेशी तडजोड करणार नाही. अस सडेतोड उत्तर ठाकूर यांनी दिले.

यशोमती ठाकूर यांनी असे उत्तर देतात प्रेक्षकांमधून शिट्यांचा आवाज व टाळ्यांचा कडकडात आला. ठाकूर यांची त्यांच्या पक्षाविषयी असलेली निष्ठा व कुठल्याही पदासाठी विचारधारेशी तडजोड न करण्याची मांडलेल्या भूमिकेविषयी आता त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.Updated : 5 May 2022 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top