Home > Political > राहुल गांधी मोदींपेक्षा जास्त संस्कारी आणि बुद्धीमान: ॲड. यशोमती ठाकूर

राहुल गांधी मोदींपेक्षा जास्त संस्कारी आणि बुद्धीमान: ॲड. यशोमती ठाकूर

राहुल गांधी मोदींपेक्षा जास्त संस्कारी आणि बुद्धीमान: ॲड. यशोमती ठाकूर
X

महिला काँग्रेस च्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही वाक्ये संदर्भ तोडून व्हायरल करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या वर सोशल मिडीयावर ट्रेंड चालवण्यात आला. आयटी सेल च्या माध्यमातून वारंवार राहुल गांधी यांच्या विरोधात चालवण्यात येणाऱ्या ट्रेंड वर महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी खरमरीत टीका केलीय. राहुल गांधी हे नरेंद्र मोदींपेक्षा जास्त संस्कारी आणि बुद्धीमान आहेत असं यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजपचे काही चमचे राहुल गांधींवर टीका करण्यात व्यस्त असतात, पण लक्षात ठेवा राहुल गांधी हेच देशाचं भविष्य आहेत. राहुल गांधी आमचे नेते असून, नरेंद्र मोदींपेक्षा जास्त संस्कारी आणि बुद्धीमान असल्याचा खोचक टोला यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे.

महिला काँग्रेस च्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही मुद्यांवरून भाजपकडून राहुल यांच्यावर टीका केली जात आहे. तर सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा केलं जातंय. त्यामुळेच यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका करत ट्रोल करणाऱ्यांचा सुद्धा समाचार घेतला.

Updated : 16 Sep 2021 8:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top