Home > 'उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपलंय', बबिता फोगटची घणाघाती टीका

'उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपलंय', बबिता फोगटची घणाघाती टीका

उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपलंय, बबिता फोगटची घणाघाती टीका
X

राज्यात सध्या कोरोनाची दहशत असताना पालघर जिल्ह्यात मात्र मॉब लिंचिंग चा (PalgharMobLynching) धक्कादायक प्रकार घडला आहे. गावकऱ्यांच्या एका छोट्याशा गैरसमजाने ३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या प्रकरणात भारतीय कुस्तीपटू आणि भाजप नेता बबिता फोगट हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर फोडताना 'उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपलंय' अशी घणाघाती टीका केली आहे.

पालघरमधील या मॉब लिंचिंगप्रकरणी १०१ जणांना अटक करण्यात आली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वस्वी जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. सोशल मीडियावर तशी मोहीमही राबवली जात आहे. आणि पुन्हा एकदा त्यांची तुलना उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासोबत केली जातेय.

बबिता फोगट (Babita Fogat) हिने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर “ महाराष्ट्राच्या पालघरमध्ये संताची मारुन हत्या.. तेही पोलिसांसमोर. उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपली आहे. लाज वाटली पाहिजे. सर्व दोषी कॅमेरासमोर आहेत. दोषींना कडक शिक्षा मिळाली पाहिजे” असं ट्वीट केलं आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गावकऱ्यांनी तिघांना चोर समजून ठार केल्याप्रकरणी आता पोलिसांनी ११० जणांना ताब्यात घेतले आहे. सुशील गिरी महाराज, जयेश आणि नरेश येलगडे हे तिघे एका कारमधून मुंबईहून सुरतला निघाले आहे. एका व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी ते जात असताना या तिघांपैकी एक जण कार चालवत होता. पालघर जिल्ह्यातील आतल्या रस्त्यांवरुन ते निघाले होते. पण गडचिंचले गावाजवळ त्यांची कार आली असता गावकऱ्यांना ते चोर असल्याचा संशय आला आणि त्यांच्या कारवर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हल्ला केला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक गावकऱ्यांनी चोर समजून या तिघांची गाडी थांबवली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत या तिघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल. असं त्यांनी म्हटलं आहे.

Updated : 20 April 2020 4:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top