Home > Political > 13 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीचा भुसावळमध्ये महिला मेळावा

13 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीचा भुसावळमध्ये महिला मेळावा

13 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीचा भुसावळमध्ये महिला मेळावा
X

आगामी स्थानिक निमणूका लक्षात घेता सर्वच पक्ष मोर्चे बांधणीच्या कामाला लागले असताना या स्पर्धेत वंचित बहुजन आघाडीही मागे नाही. याच अनुशंगाने 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा पंचायत समिती सभागृहात होणारअसून या मेळानंतर जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणी वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या पदांसाठी मुलाखती सुद्धा होणार आहेत. वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या सर्व महिला युवती व पदाधिकारी यांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Updated : 12 Feb 2021 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top