Home > Political > आता मंदिरात दिसणार महिला पुजारी

आता मंदिरात दिसणार महिला पुजारी

महिलांसाठी तामिळनाडू सरकार सुरु करणार पुजेचे ट्रेनींग कोर्स

आता मंदिरात दिसणार महिला पुजारी
X

सौज्यन्य : सोशल मीडिया

तामिळनाडूमध्ये महिला मंदिरात पुजारी बनू शकतात. यासंदर्भात माहिती देताना तामिळनाडूचे मंत्री पीके शेखर बाबू म्हणाले की, "ज्या स्त्रिया मंदिरात पुजारी बनू इच्छितात त्यांनी अर्ज करावा. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची मान्यता मिळाल्यानंतर सरकारकडून महिलां प्रशिक्षण देण्यात येइल आणि त्यानंतर त्यांची नेमणूक केली जाईल."

राज्यातील सहआयुक्तांसोबतच्या आढावा बैठकीनंतर शनिवारी 12 जून रोजी धार्मिक व धर्मादाय सहाय्य विभागाचे मंत्री पीके शेखर बाबू यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "मंदिरात पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी महिलांनी याचिका दाखल केली होती. जर या महिला प्रशिक्षित असतील तर त्यांना मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. ग्रामीण भागातील मंदिरात फक्त महिलाच पूजा करतात. मेल मलयानूर आणि मेल मारुवाथूर सारख्या मंदिरात महिलाच पुजारी आहेत."

यासंदर्भातील वृत्त इंडीया टूडे या वृत्तपत्राने दिलं आहे.

Updated : 2021-06-14T11:34:23+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top