Home > Political > "या आता आमच्या पक्षात" मंत्री ठाकूर यांचे कराळे मस्तनांना आमंत्रण, काय म्हणाले कराळे मास्तरांना पाहा..

"या आता आमच्या पक्षात" मंत्री ठाकूर यांचे कराळे मस्तनांना आमंत्रण, काय म्हणाले कराळे मास्तरांना पाहा..

"या पक्षात, तुमच्या सारखी व्यक्ती पाहिजे आमच्या सोबत" महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे नितेश कराळेंना काँग्रेस पक्षात येण्याचे आमंत्र, मग काय म्हणाले कराळे मास्टर..

या आता आमच्या पक्षात मंत्री ठाकूर यांचे कराळे मस्तनांना आमंत्रण, काय म्हणाले कराळे मास्तरांना पाहा..
X

काल नितेश कराळे मास्तर यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नितेश कराळे यांना जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. यावेळी त्यांनी त्यांना काँग्रेस पक्षात येणायचे आमंत्रण दिले. सध्या या फोन कॉलची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.

मंत्री ठाकूर यांनी कराळे मास्तरांना फोन केला आणि "मी तुमची मोठी फॅन आहे" असं म्हणत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कराळे मास्टर यांनी मंत्री ठाकुर यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत, तुम्ही माझा एक व्हिडिओ मागे शेअर देखील केला असल्याची आठवण करून दिली. मग ठाकूर यांनी "हो तुमचे व्हिडीओ मी शेअर करत असते. तुम्ही प्रॅक्टिकल आणि छान बोलता. व्हराडी भाषा तुम्ही कुठच्याकुठे नेत असल्याचे म्हणतं कराळे मास्तरांचे कौतुक केले.

मग ह्या नंतर भेटू एखाद्या दिवशी असं म्हणत, तुम्ही अभिजित वंजारी यांच्या विरोधात उभे होता का? असं विचारलं. कराळे मास्तर हो म्हणताच लगेच ठाकूर यांनी त्यांना कोणत्या पक्षातून? असं विचारलं त्यानंतर मग "पक्षात या ना" असं म्हणत मंत्री ठाकूर यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिल. "काय असेल तर सांगा. या पक्षात, तुमच्या सारखी व्यक्ती पाहिजे आमच्या सोबत." असं म्हणताच कराळे मास्तर चांगलेचं बुचकळ्यात पडले. आणि हासत हासत त्यांनी "मॅडम काम चालू आहे" असं त्यांनी उत्तर दिलं. आता मंत्री यशोमती ठाकूर आणि नितेश कराळे यांच्यामध्ये झालेल्या या संवादाची समाज माध्यमांवर चांगली चर्चा आहे.

Updated : 6 April 2022 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top