केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून महिलांना संधी मिळणार का?
X
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिल्लीत हालचाली सुरु असून, येत्या एक-दोन दिवसात नवीननवीन मंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात महराष्ट्रातून महिलांना संधी मिळणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातून खासदार डॉ. हिना गावित, प्रीतम मुंडे, पुनम महाजन, भारती पवार या महिला खासदारांसह नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या चार महिला खासदारपैकी कुणाला केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मोदी सरकारकडून नेहमीच महिलांच्या हितासाठी काम करत असल्याचा दावा केला जातो. महिलांना न्याय देण्याचा आणि पुरुषांप्रमाणे महिलांना सुद्धा योग्य संधी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा दावा सुद्धा भाजप नेते करतात. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून महिला खासदारांना भाजप संधी देणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.