Home > Political > मनसे-भाजप युती होणार? शालिनी ठाकरे काय म्हणाल्या पहा..

मनसे-भाजप युती होणार? शालिनी ठाकरे काय म्हणाल्या पहा..

मनसे-भाजप युती होणार? शालिनी ठाकरे काय म्हणाल्या पहा..
X

गेल्या महिनाभरापासून मनसेने भोंग्यांचा विषय उचलून धरला आहे. १ मेला औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केलं. या भाषणात त्यांनी राज्य सरकारला ३ मे नंतर सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा अल्टीमेटम दिला होता. यानंतर बुधवारी राज्यभरामध्ये मनसैनिकांनी अजानविरूध्द हनुमान चालिसा असं आंदोलन केलं. या सगळ्यावर आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष शालिनी ठाकरे यांच्याशी बातचित केली. या या वेळी बोलताना त्यांनी मनसे भाजप युती होणार का? या प्रश्नावर बोलताना भाजपसोबत युती होणार की नाही हा संपुर्ण राज ठाकरेंचा निर्णय आहे पण तुर्तास तरी मला तशी कोणतीही शक्यता वाटत नसल्याचं म्हंटल आहे.

यापुढे बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांनी राज ठाकरेंच्या नव्या घरात झालेल्या गृह प्रवेशामुळे अनेक जण त्यांना भेटायला येत आहेत. आमचा राजकीय प्रवास हा एकट्याने सुरूच आहे. भाजपसोबत युती होणार की नाही हा संपुर्ण राज ठाकरेंचा निर्णय आहे पण तुर्तास तरी मला तशी कोणतीही शक्यता वाटत नाही. आम्ही इतर पक्षांसाठी बोलतो हे आरोप आमच्यावर नेहमी केले जातात. त्यामुळे हे काही आमच्यासाठी नवं नाहीये. असं त्या म्हणाल्या.

या मुलखातील काय प्रश विचारला होता आणि त्यावर शालिनी ठाकरे यांनी काय उत्तर दिलं आहे पहा..

प्रश्न - भाजपचे अनेक मातब्बर नेते, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या भेटी गाठी घेतल्या आहेत. मनसे भाजप युती होणार का?


उत्तर : राज ठाकरेंचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत विशेषतः काही महत्वाच्या नेत्यांसोबत अगदी घरगुती संबंध आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या नव्या घरात झालेल्या गृह प्रवेशामुळे अनेक जण त्यांना भेटायला येत आहेत. आमचा राजकीय प्रवास हा एकट्याने सुरूच आहे. भाजपसोबत युती होणार की नाही हा संपुर्ण राज ठाकरेंचा निर्णय आहे पण तुर्तास तरी मला तशी कोणतीही शक्यता वाटत नाही. आम्ही इतर पक्षांसाठी बोलतो हे आरोप आमच्यावर नेहमी केले जातात. त्यामुळे हे काही आमच्यासाठी नवं नाहीये.

Updated : 5 May 2022 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top