Home > Political > रुपाली पाटील ठोंबरे परत मनसेत परतणार?

रुपाली पाटील ठोंबरे परत मनसेत परतणार?

रुपाली पाटील ठोंबरे परत मनसेत परतणार?
X

मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या त्यांच्या पूर्वपक्षात मनसेत पुन्हा प्रवेश करणार असल्याची एक बातमी व्हायरल होत होती. नुकताच काही महिन्यांपूर्वी रूपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोपर्यंत हि एक बातमी समोर येताच सर्वत्र मोठ्या चर्चेला उधाण आलं.

समाज माध्यमांवर जी बातमी मोठ्या वेगाने प्रसारित होत होती त्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील ह्या पुन्हा मनसे मध्ये येण्यास उत्सुक आहेत अशी माहिती सूत्रानुसार मिळाली असल्याचं लिहलं होतं. सरकारनामा या नावाच्या एका वृत्तपत्राचा तो एक फोटो होता. मात्र या सगळ्या विषयी स्वतः रूपाली पाटील ठोंबरे यांनी समाज माध्यमांवर जी बातमी प्रसारित होत आहे ती फेक न्युज असल्याचं सांगितला आहे. त्यांनी या वृत्तपत्राशी संपर्क केला आणि त्यानंतर त्या वृत्तपत्राने अशी कोणतीही बातमी दिली नसल्याचं उघड झालं. मग त्या वृत्तपत्राचे नाव वापरून समाज माध्यमांवर जे व्हायरल होत आहे ते कुणीतरी अशाप्रकारची फेक बातमी समाज माध्यमांवर पसरवली आहे.

समाजमाध्यमांचा गैरवापर करत कुठल्यातरी नामांकित वृत्तपत्र, न्यूज चॅनेलचा फोटो एडिट काहीतरी भलताच गैरसमज निर्माण करणारा कंटेंट समाज माध्यमांवर प्रसारित करून ते व्हायरल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तशाच प्रकारे रुपाली ठोंबरे ह्या पुन्हा मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याची फेक बातमी समाज माध्यमांवर वायरल करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाबाबत रुपाली ठोंबरे यांनी स्वतः खुलासा केला आहे. त्यांनी काय म्हटले आहे पहा..


Updated : 20 March 2022 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top