Home > Political > सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार - मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार - मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार -  मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
X

महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी नियम, कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याला प्राधान्य देऊन सर्व विभागांच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला धोरण 2014 मध्ये सुधारणा करुन सुधारित चौथ्या महिला धोरणाबाबत प्रारूप मसुदा सादरीकरण व चर्चा करण्याकरिता स्थापन समित्यांची बैठक महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, समाजातील प्रत्येक घटकातील महिलेला महिला धोरणाच्या मसुदा निर्मितीमधे सहभागी करुन त्यांचे मत घेणे गरजेचे आहे. चौथ्या महिला धोरणाच्या मसुद्याबाबत नऊ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या समितीतील सदस्यांनी आपले अभिप्राय व सूचना मांडल्या. या अभिप्राय व सूचनांचा विचार करून महिला धोरणाचा मसुदा तयार करून तो सर्व विभागांना पाठवून त्यांचे अभिप्राय घेण्यात येतील.

मंत्रालयात आयोजित बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील उपस्थित होते.




Updated : 13 Oct 2021 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top