Home > Political > एकनाथ शिंदे मुंबईत येणार?

एकनाथ शिंदे मुंबईत येणार?

एकनाथ शिंदे मुंबईत येणार?
X

गेल्या चार दिवसांपासून राज्यातील सरकारमधले ४० पेक्षा जास्त आमदार गुवाहाटी मध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकृत बंगला देखील सोडला आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी थेट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. एकनाश शिंदे यांनी आपलाच गट अधिकृत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यापालांनी अजून काहीही भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटतील अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे गुवाहाटी मधील हॉटेल मधून बाहेर पडले असल्याचं म्हंटल जात आहे. ते मुंबईला किंवा दिल्लीला जाऊ शकतात अशी सर्वत्र चर्चा आहे. सद्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे दिल्ली येथे जाऊन कोणाच्या गाठीभेटी घेतात? की ते थेट मुंबईला येऊन राज्यपालांना भेटतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा..


राज्यपाल शांत का आहेत?

गेल्या चार दिवसांपासून राज्यातील सरकारमधले ४० पेक्षा जास्त आमदार आम्ही सरकारसोबत नाहीत, असे जाहीरपणे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकृत बंगला सोडला आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी थेट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. एकनाश शिंदे यांनी आपलाच गट अधिकृत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यापालांनी अजून काहीही भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी राज्यपाल आणि भाजपला काही सवाल उपस्थित केले आहेत.

"गेल्या काही दिवसांपासून राज्यात अभूतपूर्व राजकीय गदारोळ सुरू असताना व सत्ताधारी #शिवसेना + सरकारला पाठिंबा देणार्‍या पक्षाचे आणि अपक्ष असे ४० हून अधिक आमदार/मंत्री #आसाम ला असताना राज्यपालांकडून काहीही भाष्य होत नाही. किंबहुना ते मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांच्याकडे चौकशी करताना वस्तुस्थिती जाणून घेताना दिसत नाहीत. असे कसे काय घडू शकते? #महाविकासआघाडी सरकारकडे बहुमत आहे की नाही आणि नसेल तर पुढे काय हे जाणून घेण्याची #राजभवन ची इच्छा नाही की काय? हे सारेच अनाकलनीय आहे. विरोधी पक्ष #भाजपा कडूनही यावर काहीही भाष्य होत नाही. असे का? #महाराष्ट्र #मुंबई तुम्ही तुमचं #हिंदुत्व सोडलं की काय?' असे पत्रातून विचारणारे #कोश्यारी महोदय आता हे हिंदुत्व आहे की निसटलंय हे ही विचारत नाहीत? मजेशीरच आहे. ही परिस्थिती राज्यातल्या इतर कोणत्याही मनाला चिंतित करत नाही? #महाराष्ट्र_संकट #काँग्रेस #एकनाथशिंदे #राष्ट्रवादी

राज्यपालांना कोरोना झाला असला तरी त्यांचा कार्यभार कुणाकडेही सोपवण्यात आलेला नाही. स्वत: राज्यपालांनी आपल्याला सौम्य लक्षणं असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला जात असताना राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल यामध्ये एक्टिव्ह का झालेले नाहीत, अशी चर्चा आहे. तसेच भाजपनेही यावर मौन का बाळगले आहे, अशीही चर्चा आहे.

Updated : 24 Jun 2022 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top