Home > Political > देवेंद्र फडणवीस 2024 लोकसभा पुण्यातून लढवणार? अमृता फडणवीस म्हणाल्या..

देवेंद्र फडणवीस 2024 लोकसभा पुण्यातून लढवणार? अमृता फडणवीस म्हणाल्या..

देवेंद्र फडणवीस 2024 लोकसभा पुण्यातून लढवणार?  अमृता फडणवीस म्हणाल्या..
X

काल पुणे येथे पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री झाले तर मला आवडेल असं वक्तव्य केलं. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस 2024 ची लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवणार का? याबाबत देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी जे. पी. नड्डा यांना पत्र पाठवून केली. ब्राह्मण महासंघाच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस हे 2024 ची निवडणूक पुण्यातून लढवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुण्यात होत्या यावेळी पत्रकारांशी बोलताना, "देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी, कर्मभूमी व बालेकिल्ला हा नागपूर आहे पण असं असलं तरी ते आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात. मला महाराष्ट्र आवडतो मला इथेच राहायचं आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच बघायला आवडेल." अशी प्रतिक्रिया दिली.

याच दरम्यान बोलत असताना अमृता फडणवीस यांनी पुणे हे माझं आजोळ आहे. मला जेव्हा संधी मिळते तेव्हा मी पुण्यात येते. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आणि पुण्याचे दोन्ही ठिकाणचे पालकमंत्री झाले तर मला आवडेल" असं म्हणत पुणे फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडेच घ्यावे ही इच्छा बोलून दाखवली.

Updated : 20 Aug 2022 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top