Home > Political > "वैवाहिक बलात्कारास गुन्हा म्हणून का मानले जात नाही?"

"वैवाहिक बलात्कारास गुन्हा म्हणून का मानले जात नाही?"

खासदार वंदना चव्हाण यांचा राज्यसभेत सवाल

X

खासदार वंदना चव्हाण यांनी आज राज्यसभेत वैवाहिक बलात्कारांचा मुद्दा मांडत भारतात वैवाहिक बलात्कार हा गुन्हा का मानला जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला. जगातील १०० हून अधिक देशांमध्ये वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जातो. ज्या ३६ देशांमध्ये हा गुन्हा मानला जात नाही, त्यापैकी भारता हा एक देश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अनेक वर्षांपासून वैवाहिक बलात्काराचा गुन्हेगारीकरण करण्याची गरज असल्याची मागणी अनेक स्तरांतून होत आहे. वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरवावा, अशी विचारणा करणार्या अनेक महिला संघटना आहेत. लॉकडाउननंतर अश्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यामुळे या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Updated : 15 March 2021 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top