Home > Political > बाळासाहेब थोरात जागे व्हा, कॉग्रेसच्या बुडत्या जहाजाला महिलाच तारतील..

बाळासाहेब थोरात जागे व्हा, कॉग्रेसच्या बुडत्या जहाजाला महिलाच तारतील..

बाळासाहेब थोरात जागे व्हा, कॉग्रेसच्या बुडत्या जहाजाला महिलाच तारतील..
X

महात्मा गांधी, नेहरु, शास्त्रीजी आणि इंदिराजींच्या विचाराने चालणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या कॉंग्रेसला आपल्या मुळ विचारधारेचा विसरपडलाय का? असा प्रश्न पडतो. त्याचे करणही तसंच आहे. एकेकाळी देशातला प्रबळ सत्ताधारी असलेला 'कॉंग्रेस आता मरायला टेकलेय' असं म्हटलं जातय. या कॉंग्रेसला आपण पुन्हा शक्तीशाली होऊ अशी आशा आहे ती सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या जोरावर. अशा या कॉंग्रेस पक्षाचं महाराष्ट्रात नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना महिला नेत्यांबद्दल दुजा भाव का? असा प्रश्न पडतो.

तुम्हाला वाटेल हे सर्व आता मध्येच कशासाठी तर सांगतो.. कॉंग्रेसची आज मुंबईत विधानभवनातील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी मा. एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. याच वेळी कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनाही श्रद्धांजली देण्यात आली. पण दोन महिला कॅबीनेट मंत्री सभागृहात उपस्थित असतानाही त्यांना कार्यक्रमाच्या व्यासपिठावर संधी देण्यात आली नाही.


अशा वेळी महिला सक्षमीकरणाबाबत वारंवार घोषणा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांना स्वत:च्याच कार्यक्रमात महिलांचा विसर का पडतो हे कळत नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात वेळीच जागे व्हा कारण कॉग्रेसच्या बुडत्या जहाजाला महिलाच तारतील..Updated : 3 Dec 2020 3:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top