Home > Political > "रेखा शर्मा यांना कंगना बद्दल कड आलाय" – निलम गोऱ्हे

"रेखा शर्मा यांना कंगना बद्दल कड आलाय" – निलम गोऱ्हे

केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सोमवारी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांनी या दौऱ्यात भाजप व्यतीरिक्त इतर राजकीय पक्षाच्या महिला प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधींची भेट घेतली नाही. या संदर्भात शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

रेखा शर्मा यांना कंगना बद्दल कड आलाय – निलम गोऱ्हे
X

केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सोमवारी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांनी या दौऱ्यात भाजप व्यतीरिक्त इतर राजकीय पक्षाच्या महिला प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधींची भेट घेतली नाही. या संदर्भात बोलताना शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या की, "राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी आज महाराष्ट्राला भेट दिली. देशातील सर्व महिलांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्या महाराष्ट्रात आल्या त्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही त्या जरूर येऊ शकतात. परंतु त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर राजकीय पक्षाच्या महिला प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधी यांना बोलविणे आवश्यक होते."

"निर्भय फंड बाबत त्यांनी जो विषय घेतला त्यात केंद्र सरकारने निर्भय फंडाची रक्कम कमी केलेली आहे. त्याचबरोबर दोष सिद्धीचे प्रमाण संपूर्ण देशात ३०% आहे. बलात्काराच्या घटना फक्त ३०% आरोपींना शिक्षा होते आहे. हा शिक्षाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना दिल्या असत्या तर ठीक झाले असते. महाराष्ट्रात दोष सिद्धीचे प्रमाण ४८% असले तर याच्याबद्दल अधिक काम करणे शक्य झाले असते."

"सर्वात महत्वाचे त्या हाथरस येथे न जात त्यांनी मुंबई मध्ये धाव घेतली. कंगना पाकव्याप्त कश्मीर बोलली त्याबद्दल त्यांना कड आलेली आहे. त्याच्यामुळे गंधारिने ज्याप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधली होती तशी त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे दुर्योधनाचे संरक्षण करण्यापेक्षा त्यांनी स्वतः सक्षम भूमिकेतून, निरपेक्ष भूमिकेतून आम्हाला बोलावले असते आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला असता". निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

Updated : 21 Oct 2020 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top