Home > Political > राजकारणात नसत्या तर अदिती तटकरे कोण झाल्या असत्या?

राजकारणात नसत्या तर अदिती तटकरे कोण झाल्या असत्या?

राजकारणात नसत्या तर अदिती तटकरे कोण झाल्या असत्या?
X

आपली राजकीय पार्श्वभूमी आहे त्यामुळे आपण आपलं करिअर राजकारणातच केलं पाहिजे असा अजिबात नाही, आज अनेक तरुण घरची पार्श्वभूमी राजकीय असली तरी सुद्धा ते राजकारणापासून फार दूर आहेत. राज्याच्या माजी राज्यमंत्री आदिती तटकरे यांना सुद्धा त्या राजकारणात येणार कि नाही याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. त्यांना राजकारणात येण्यात रस देखील नव्हता मात्र काही अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे त्यांना राजकारणात येणे भाग पडलं. अदिती तटकरे यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला आणि आज आदिती तटकरे राजकारणात नसत्या तर त्या कोण झाल्या असत्या? या सगळ्याविषयी स्वतः त्यांनीच माहिती दिली आहे. मुंबईत MaxWoman आयोजित महाचाय प्रस्तुत MaxWoman Conclave या कार्यक्रमात आदिती तटकरे सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी यावेळी त्यांचा संपूर्ण प्रवास उलघडला आहे. कसा होता हा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहूया...

अदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) यांना जरी मोठा राजकीय वारसा असला तरी सुरुवातीला त्या राजकारणात येणार की नाही हे त्यांना देखील ठाऊक नव्हतं.. म्हणूनच त्यांनी महाविद्यालयीन काळात शिकत असताना राज्यशास्त्र आणि इतिहास असे विषय निवडले होते आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात फेलो प्रोफेसर म्हणून काम करण्यास सुरवात केली. पण त्यांचा हा प्रवास काही काळापुरताच मर्यादित राहिला कारण त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची वेळ आली.. 2009 मध्ये सुनिल तटकरे (Sunil Tatkare)यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यात पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यांची जबाबदारी वडिलांनी त्याच्यावर दिली आणि त्यांची राजकारणातील एन्ट्री झाली. जिल्हा परिषद निवडणूक, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा प्रवासानंतर 2019 च्या निवडणूकीत त्यांना विधानसभेची संधी आणि त्यानंतर मंत्रीमंडळात काम करण्याचीही संधी दिली. त्यानंतर वेगवेगळ्या आठ खात्यांचा पदभार अदिती तटकरे सांभाळत होत्या. पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलेल्या अदिती तटकरे यांनी ही सर्व खाती अत्यंत प्रभावीपणे सांभाळली. त्यानंतर त्यांच्या खांद्यावरती आणखीन चार खात्यांची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्या चार खात्यांची नावे देखील आदिती तटकरे यांना आठवतं नाहीत.. आता एखाद्या खात्याचे मंत्रीपद तुम्हाला मिळतं आणि त्याचं नाव तुम्हाला माहित होत नाही किंवा आठवतं नाही असं कसं होऊ शकतं?

आदिती तटकरे ज्या आठ खात्यांचा पदभार सांभाळत होत्या त्या व्यतिरिक्त त्यांना आणखीन चार खात्यांचा पदभार देण्यात आला, म्हणजेच एकूण बारा खाती राज्यमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्याकडे होती. पहिला आठ खात्यांचा पदभार सांभाळत असताना त्यांच्यावर 2022 च्या जून मध्ये फक्त चारच दिवसांसाठी आणखीन चार खात्यांचा पदभार देण्यात आला होता. असा हा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे. मुंबई MaxWoman आयोजित MaxWoman Conclave या कार्यक्रमात अदिती तटकरे सहभागी झाल्या होत्या. आणि याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास उलगडला आहे. हा प्रवास करत असताना आलेल्या अनेक अडचण, त्या अडचणींवर मात करण्यासाठी केलेली धडपड आणि आता आमदार या पदापर्यंतची वाटचाल या संपूर्ण प्रवासाविषयी त्यांनी MaxWoman Conclave मध्ये सांगितले आहे. हा संपूर्ण एपिसोड तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही MaxWoman च्या फेसबुक आणि युट्युब चॅनेल ला नक्की भेट द्या..

Updated : 19 May 2023 12:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top