Home > Political > मुख्यमंत्र्यांसोबत एकनिष्ठ असलेल्या या महिला कोण?

मुख्यमंत्र्यांसोबत एकनिष्ठ असलेल्या या महिला कोण?

मुख्यमंत्र्यांसोबत एकनिष्ठ असलेल्या या महिला कोण?
X

सध्या राज्याच्या राजकारणात एक मोठा पेज निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 हुन अधिक आमदारांसह बंड केला. आणि रात्रीत ते मुंबईहून थेट सुरतला पोहोचले व सुरत वरून थेट गुवाहतील. जसजसे दिवस जातील तसतसे शिवसेनेतील आणि निष्ठावंत समजले जाणारे नेते सुद्धा शिंदे गटाला जाऊन मिळू लागले आहेत. एकीकडे शिवसेनेला हे भलंमोठं खिंडार पडत असताना. शिवसेनाप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेल्या एकमेव महिला म्हणून सद्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजचे विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे. शिवसेनेतील इतके मातब्बर नेते शिंदे गटाला मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या नीलम गोऱ्हे नक्की आहेत तरी कोण पाहुयात..

नीलम गोरे चळवळीतील एक आघाडीच्या कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा सामाजिक कार्यकर्त्या ते शिवसेनेच्या महत्वाच्या नेतेपदापर्यंतचा प्रवास फारच रंजक आहे. सुरवातीला त्यांची दलित चळवळीतील एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी केलेला संघर्ष व शिवसेनेत विधान परिषदेच्या उपसभापती पदापर्यंतचा प्रवास कसा होता वाचा..

नीलम गोऱ्हे कोण आहेत?

डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे या मूळच्या पंढरपूरचा आहे. नीलम गोरे या राजकारणात सक्रिय असल्या तरीही त्या व्यवसायाने एक डॉक्टर आहेत त्यांनी बी. एस. ए. एम. चे शिक्षम मुंबई विद्यापीठ, पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय जेथून पूर्ण केले आहे. त्याच सोबत त्यांनी १९९२ मध्ये बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमा सुद्धा केला आहे.

संस्थापिक

नीलम गोरे यांचं स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी केलेले काम अत्यंत मोठं आहे. त्या स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटनेच्या अध्यक्षा आहेत. याच सोबत पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर १००० च्यावर त्यांनी देशभरात व्याख्याने दिली आहेत. यामध्ये हुंडा बंदी, सामाजिक विषमता, महिला सक्षमीकरण, महिला संघटन इत्यादी कार्यक्रमाचे देखील आयोजन महाराष्ट्रभर केले आहे. याच सोबत १९९३ लातूर - उस्मानाबाद व २००० गुजरात येथील भूकंपग्रस्तांना तसेच, १९९३ मुंबई येथील बॉम्बस्फोटातील कुटुंबियांना मदतकार्य. तसेच २००६ साली मुंबई बॉम्बस्फोटानंतर नेपाळी कुटुंबियांना मदतकार्यत देखील त्यांचा मोठा सहभाग होता.

नीलम गोऱ्हे यांनी १९९० ते १९९१ चित्रपट परीक्षण मंडळावर सदस्य म्हणून देखील कार्य पाहिले आहे. त्याच सोबत १९९३ ते १९९४ नाट्यपरीक्षण मंडळावर देखील त्या होत्या. पथनाट्य लेखन, महिलाविषयक चित्रपट, नाटके यावरील समीक्षा : पाश्चात्य नाट्यकृती व कविता गायन कार्यक्रमाचे अनेक ठिकाणी त्यांनी आयोजन केले आहे.

त्या १९९९ ते २००० मध्ये अध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा सुद्धा राहिलेल्या आहेत. व महाराष्ट्र राज्याच्या १९९४, १९९८, २००१ व २००३ च्या महिला धोरण निर्मितीत देखील त्यांचा सहभाग होता. यासोबत १९९२ - १९९३ सदस्या, भारतीय लोकविकास कार्यक्रम, १९९३ ते १९९५ सदस्या – महाराष्ट्र राज्य महिला आयोग, १९९८ सदस्या, पर्यावरण संतुलन व संरक्षण समिती, भारत सरकार, १९९४ ते १९९५ सदस्या, हुंडानिर्मुलन समिती व कायदा सहाय्य समिती, १९९२ - १९९८ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या निमंत्रक आशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत.

वेगवेळ्या समित्यांवर केलेले काम...

नीलम गोऱ्हे या २००० पासून शिवसेना महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख कार्यभार पाहू लागल्या या दरम्याम त्यांनी स्त्री मतदारांच्या जाहीरनामा कार्यक्रमात सहभाग, शिवसेनेच्या सर्व आंदोलनात सहभाग : शिवसेना – भाजप वचननामा २००४ च्या समितीच्या सदस्या, २००४ सिनेट सदस्या, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, २०१६-१८ सिनेट सदस्या, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, २०१० ते २०१४ पर्यंत शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कनेत्या, २००७ ते २०१८ शिवसेना प्रवक्त्या म्हणून देखील काम पाहिले.

नीलम गोऱ्हे यांनी उल्लेखनीय केलेले काम...

महाराष्ट्रातील ५००० पेक्षा अधिक कुटुंबे व महिलांना कायदेशीर मदत, सल्ला मार्गदर्शन, समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यासोबत घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा विषयांमध्ये महिलांच्या मदत गटांची स्थापना असेल किंवा स्त्री आधार केंद्रामार्फत न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्य आणि सक्रीय सहकार्य आशा माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे.

राजकीय प्रवास..

कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात नीलम गोऱ्हे यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी आजपर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. २०१५ पासून विधानपरिषदेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद म्हणून त्यांनी पाहिलेलं काम असेल किंवा शिवसेना उपनेत्या (२००५), शिवसेना प्रवक्त्या (२००७) शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख (२०१) सन २००७ ते आजतागायत (२०१८) पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून सामाजिक न्याय, राजकीय भूमिका विषयांवर कार्य व मराठी, हिंदी, इंग्रजी वाहिन्यांवर सामाजिक विषयांवर ६००० चर्चासत्रात सहभाग,

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्य म्हणून चार वेळा (२००२ – २००८, २००८ ते २०१४, २०१४, २०१८ ते आजपर्यंत) बजावला आहे. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांची शिवसेना स्टार प्रचारक म्हणून देखील नियुक्ती करण्यात आहे आहे. इतका सारा राजकीय प्रवास पार करत नीलम गोरे आज विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.

विधान परिषदेच्या महिलाविषयक विविध समित्यांवर विविध पदांवर काम

• बीड येथील अवैध शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या प्रकरणाची चौकशी समितीच्या अध्यक्षा

• महिला सबलीकरण समिती सदस्या

• पंचायत राज समिती, ग्रामीण विकास समिती सदस्यत्व

• भारताकरिता महिला धोरण ठरविण्याकरिता संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या सहकार्याने प्रयत्न.

• महाराष्ट्रातील विविध महिलाविषयक कायद्यात आवश्यक ते बदल सुचविण्यात महत्वाची भूमिका.

विधान परिषदेतील विविध समित्यांवर काम :

• २००२ -२००८ सदस्या, महाराष्ट्र विधान परिषद : विधी मंडळाच्या महिला तदर्थ समिती, आश्वासन समिती, महिलांचे हक्क व कल्याण समिती, पंचायत राज समिती, ग्राम विकास समिती व २०१४ पूर्वी अल्पसंख्यांक समितीच्या सदस्या,

• विशेष हक्क समिती प्रमुख २०१५ ते २०१८ कार्यरत

• अंदाज समिती – २०१० – २०१३ ते २०१८

• आश्वासन समिती २००४-२००८

• एच आय व्ही / एड्स जनजागृती समिती - २०१३-१४

• कामकाज सल्लागार समिती – २०१३-१८

• गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा समिती सदस्य २०१५-१८

• महिलांच्या सुरक्षाविषयक आय टी समिती २०१७-१८

* विविध प्रकारच्या संपर्क क्षेत्राशी समन्वय

* जनसाथी दुष्काळ निवारण मंचच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकरी व ग्रामीण भागातील शेतकरी, महिला यांच्याकरिता रोजगार विषयक कार्य, शासनाकडे पाठपुरावा

* आंतरराष्ट्रीय पातळीवरील डेव्हलपमेंट सपोर्ट टीमच्या स्व मदत गट आणि मुलांच्या हक्क विषयक परिषदेत सहभाग.

* खाण कामगार संदर्भात काम

• आदिवासीकरिता विदर्भ विकास मंचच्या माध्यमातून संयुक्त वनीकरण कार्यक्रमाबाबत जागृती २०१२ – २०१५

• महिलांकरिता निर्भया मोहिमेच्या माध्यमातून काम २०१० ते २०१४

• एशिया पसिफिक फोरम मध्ये सहभाग २००२-२००६

* मानवी हक्क क्षेत्रातील काम :

• महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी महिलांच्या कायद्याविषयी संवेदनशीलता वाढविण्याच्या हेतूने १०० पेक्षा अधिक कृतीसत्रांचे आयोजन

• महिला न्यायाधीशांकरीता संवेदनशीलता वाढवून लवकर निकाल लागावेत यासाठी युएनडीपी आयोजित परिषदेत सहभाग २०१६

• महाराष्ट्रातील दुर्गम आणि मागास क्षेत्रात सामाजिक बांधिलकी म्हणून १९८१ ते १९९२ या काळात वैद्यकीय सेवाकार्य

• वैद्यकीय सामाजिक कार्यातील या कामाने समाज कार्याला सुरुवात

• भूमिहीन मजुरांच्या हक्कासाठी समाजात काम – १९८५-९४

* दलित आणि भटक्या जमातीसाठी विकास चळवळीत काम

• रोजगार हमी योजना, दुष्काळग्रस्त कुटुंबातील महिलांसाठी धोरण ठरविण्यात मागील ३५ वर्षांपासून सहभाग

• महिला व मुलींच्या अनैतिक व्यापार क्षेत्रात मुलींच्या संरक्षणात कायदेशीर मदत व आधार देण्याचे काम

• मुस्लीम महिलांमधील अल्प वयात लग्न आणि तोंडी तलाक देण्याच्या विषयावर राष्ट्रीय पातळीवर कार्यशाळेचे आयोजन

• दलित अत्याचार व महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पिडीत कुटुंबाना प्रत्यक्ष भेटी देऊन आधार देण्याचे काम अव्याहतपणे सुरु. राज्य शासनाकडे अशा कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आग्रह.

• लातूर परिसरातील भूकंपग्रस्त महिलांसाठी विशेष कार्य १९९३ ते आजतागायत २६ वर्ष

• विकलांग व दुर्बल व्यक्तीसंदर्भात अनेक काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी संलग्नता. अंध, श्रवणदोष, विशेष मुलींच्या शाळा, आदिवासी मुलींच्या आश्रमशाळा अशा अनेक संस्थांशी सातत्याने काम.

• हुंडाबळी, घटस्फोट, पोटगी, बलात्कार कायदा, हिंदू विवाह कायदा, गर्भपात कायदा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा, गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा अशा अनेक विषयांवर १९९३ ते २०१० या काळात अनेक परिषदा, कार्यशाळा, परिसंवाद यांचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आयोजन.

• नाओ या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उपक्रमात सातत्याने सहभाग १९९६ – २०००

ट्रान्स एशियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत

• स्त्री आधार केंद्राच्या वतीने ट्रान्स एशियन चेम्बर ऑफ कॉमर्ससोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विषयावर मुंबईमध्ये कार्यशाळा २००६

• ४४ देशांच्या प्रतिनिधींची उदयपुर राजस्थान येथे आरोग्य व प्रजनन हक्काविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजन. एक थांबा तक्रार निवारण केंद्राची संकल्पना रचना व सादरीकरण १९९८.

• राष्ट्रकुल संसदीय दौरा- चीन, युरोप, ऑस्ट्रेलिया

इतकंच नाही तर नीलम गोरे यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिखाण देखील केले आहे. त्यांची वेगवेगळ्या विषयांवर अनेक पुस्तके देखील प्रकाशित झाले आहेत. असा विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांचा राजकीय व सामाजिक प्रवास आहे.

Updated : 28 Jun 2022 4:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top