Home > Political > कोण आहे सोनिया दुहान? जिने २०१९ मध्ये फडणवीस सरकार पाडले होते...

कोण आहे सोनिया दुहान? जिने २०१९ मध्ये फडणवीस सरकार पाडले होते...

कोण आहे सोनिया दुहान? जिने २०१९ मध्ये फडणवीस सरकार पाडले होते...
X

बॉबकट, दिसायला एकदम गोरे-गोमटी अशी ही एक तरुण मुलगी सध्या देशभरात चर्चेत आहे. याच तरुणीचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतो आहे त्यामध्ये त्या पक्ष कार्यालयात असलेला प्रफुल पटेल यांचा फोटो हटवताना दिसत आहेत. याच तरुणीने 2019 मध्ये फडणवीस सरकार धुळीस मिळवलं होतं. अजित पवारांचं बंड मोडून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी ही तरुणी कोण आहे?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदार मागच्या रविवारी एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले. ते सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत असलेले उर्वरित नेते आणि आमदारांमध्ये अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांनी सोमवारी दिल्लीतील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यालयातून प्रफुल्ल पटेल यांचा फोटो काढून टाकला...

प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या इतर सर्व नेत्यांच्या फोटो फ्रेम्स आम्ही हटवल्या आहेत कारण ते आता राष्ट्रवादी कुटुंबाचा भाग नसल्याचं सोनिया दुहान यांनी म्हंटलंय. या वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे सोनिया पहिल्यांदाच चर्चेत नाहीत. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये अजित पवारांच्या बंडावेळी पक्षासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती... अजित पवार व फडणवीसांचा शपथविधी झाला पण यावेळी सोनियाने नक्की काय केलं आणि अजित पवारांना पुन्हा राजीनामा देऊन मागे यावं लागलं पाहुयात..

कोण आहे सोनिया दुहान? जिने २०१९ मध्ये फडणवीस सरकार पाडले...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांना राष्ट्रवादीचे संकट मोचन म्हणूनही ओळखले जाते. 2019 मध्ये सोनियांनी महाराष्ट्रात भाजप व अजित पवार यांचे सरकार स्थापन होत असताना महत्वाची भूमिका बजावली होती. 2019 मध्ये दुहान यांनी हरियाणातील गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना वाचवून अजित पवार गटासह सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न धुळीस मिळवले होते. तर झालं असं होतं २०१९ ला अजित पवारांनी राजभवानावर जात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. अजित पवार समर्थक ४ आमदार हरयाणातील गुरुग्राममधील हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यांची तिथून सुटका करत सोनिया यांनी आमदारांना महाराष्ट्रात आणलं होतं. शरद पवारांनी अजित पवारांचं बंड मोडून काढलं. त्याच दुहान यांची भूमिका महत्त्वाची होती..

Updated : 11 July 2023 4:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top