Home > Political > Rahul Narvekar : राहुल नार्वेकर कोण आहेत..?

Rahul Narvekar : राहुल नार्वेकर कोण आहेत..?

Rahul Narvekar : राहुल नार्वेकर कोण आहेत..?
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळले आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गटाचे नवे सरकार स्थापन झाले. या सरकारने विधिमंडळात पहिला मोठा विजय मिळवला आहे. दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजप शिंदे गटातर्फे असलेले उमेदवार राहुल नार्वेकर हे विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. भाजप-शिंदे गटाचे विजयी झालेले नवीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नक्की कोण आहेत पाहुयात..

अ्ॅड. राहुल सुरेश नार्वेकर कोण आहेत?

राहुल नार्वेकर यांचा जन्म मुंबईत झाला. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर ते या पदावर बसणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याकडे एक उच्चशिक्षित अध्यक्ष म्हणून आता पाहिले जात आहे. बीकॉम व त्यानंतर एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाने वकील असलेले राहुल नार्वेकर कालांतराने राजकारणात आले. सुरवातीला शिवसेना, राष्ट्रवादी मग भाजप असा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे. त्यांचे अनेक शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांशी निकटचा संबंध आहे. त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते कायदेशीर सल्लागार म्हणून देखील काम पाहतात. त्याची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. 2014 ला त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व पक्षाचे प्रवक्ते म्हणून देखील जबाबदारी पार पाडली. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आले. 2014 ते 2019 ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. व याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते कुलाबा मतदारसंघातुन निवडून आले. भाई जगताप यांचा पराभव करत त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. असा हा सुरेश नार्वेकर यांचा संपूर्ण राजकीय प्रवास आहे. या व्यतिरिक्त त्यांना 2015 -16 चा राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. राहुल नार्वेकर हे रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.

काशी पार पडली अध्यक्षपदाची निवडणूक -

भाजप आणि शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. समाजवादी पार्टीचे २ आमदार आणि MIM च्या एका आमदाराने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तसेच मनसेचे आमदार राजू पाटील भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला. तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या ३ आमदारांनी भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला. भाजपचे १०६ आमदार असले तरी आजारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यावेळी गैरहजर होते. या दोघांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीत अँम्ब्युलन्समधून येऊन मतदान केले होते. दरम्यान शिवसेनेने व्हीप बजावलेला असताना त्यांच्या आमदारांना पक्षादेशाविरोधात मतदान केल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यासंदर्भातले पत्र वाचून दाखवले आणि हा मुद्दा रेकॉर्डवर घेतल्याचे सांगण्यात आले.

Updated : 3 July 2022 9:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top