Home > Political > आमदारकीसाठी राज्यपाल पदाचा राजीनामा देणाऱ्या बेबी राणी मौर्य कोण आहेत?

आमदारकीसाठी राज्यपाल पदाचा राजीनामा देणाऱ्या बेबी राणी मौर्य कोण आहेत?

आमदारकीसाठी राज्यपाल पदाचा राजीनामा देणाऱ्या बेबी राणी मौर्य कोण आहेत?
X

निवडणुक म्हटलं की भल्याभल्यांना ती लढवण्याचे वेध लागतात. त्यासाठी राजकारणात येण्यासाठी अनेक जण आपलम काम, पेशा सोडतात. पण आता निवडणूकीचं वेड इतकं वाढत चालंलय की उमेदवार राज्यपाल पदाचा राजीनामा देऊ लागलेत.


उत्तर प्रदेशमधील आग्रा ग्रामीण विधानसभा निवडणूकीत प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार उतरवला होता. त्यात भाजप तर्फे बेबी राणी मौर्य यांना तिकीट दिलं गेलं होतं. विशेष म्हणजे ही निवडणूक लढवण्यासाठी बेबी राणी यांनी आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. आता त्या आग्रा ग्रामीण मतदारसंघातून एक लाख मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या नंतर बसपाच्या किरण प्रभा केशरी या ५६ हजार मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघींमध्ये तब्बल ६४ हजार मतांचा फरक आहेत. सध्या या विधानसभेतील निकालाच्या ३४ पैकी ३० फेऱ्या झाल्या आहेत. आणखी ४ फेऱ्यांच्या निकालानंतर कोण विजयी होईल हे अधिक स्पष्ट होईल.


कोण आहेत बेबी राणी मौर्य?

१९५६मध्ये जन्मलेल्या बेबी राणींच्या राजकीय कारकिर्दीला १९९० मध्ये सुरूवात झाली. भाजप कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. १९९५ मध्ये, त्यांनी भाजपच्या तिकिटावर आग्रा महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि प्रचंड जनादेशाने त्या विजयी झाल्या, त्यानंतर त्या शहराच्या महापौरपदी निवडून आल्या. आग्राच्या महापौर बनलेल्या त्या पहिल्या महिला होत्या शिवाय २००० पर्यंत त्या महापौर पदावर कार्यरत होत्या.

२००१ मध्ये त्यांना उत्तर प्रदेश समाज कल्याण मंडळाचे सदस्य बनवण्यात आले. दलित महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन, त्यांना २००२ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य बनवण्यात आले. त्यांनी २००५ पर्यंत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणून काम केले.

२००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मौर्य यांना एतमादपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली पण या निवडणुकीत त्यांचा बहुजन समाज पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार नारायण सिंह सुमन यांच्याकडून पराभव झाला. २०१३ ते २०१५पर्यंत भाजपने सोपवलेल्या अनेक राज्यस्तरीय जबाबदाऱ्यांमध्ये तिचा सहभाग होता. जुलै २०१८ मध्ये त्यांना राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य करण्यात आले.

२१ ऑगस्ट २०१८ ला, मौर्य यांची भारत सरकारने उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. २००९ मध्ये नियुक्त झालेल्या मार्गारेट अल्वा यांच्यानंतर या पदावर असलेल्या त्या दुसऱ्या महिला राज्यपाल ठरल्या. त्यांनी कृष्णकांत यांच्याकडून हे पद स्वीकारले. १९९७ मध्ये त्यांना उत्तरप्रदेश रत्न तर १९९८ मध्ये नारी रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Updated : 10 March 2022 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top