Latest News
Home > Political > कोण आहेत अॅड. जयश्री पाटील, ज्यांच्यामुळे गृहमंत्र्यांची CBI चौकशी लागलेय

कोण आहेत अॅड. जयश्री पाटील, ज्यांच्यामुळे गृहमंत्र्यांची CBI चौकशी लागलेय

ज्यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुखांची CBI चौकशी लागलेय त्या अॅड. जयश्री पाटील यांच्याबद्दल या पाच गोष्टी माहित असणं गरजेचं आहे.

कोण आहेत अॅड. जयश्री पाटील, ज्यांच्यामुळे गृहमंत्र्यांची CBI चौकशी लागलेय
X

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. कारण परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या प्राथमिक सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने ज्या याचिकेवर हा निर्णय दिला ती याचिका अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केली होती. त्यामुळे थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना अडचणीत आणणाऱ्या अॅड. जयश्री पाटील नेमक्या कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय.

कोण आहेत अॅड. जयश्री पाटील?

जयश्री पाटील या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या असून, त्या मानवाधिकारांबाबत काम करतात. त्यासंदर्भात अनेक पुस्तकं देखील त्यांनी लिहिली आहेत. एवढच नाही तर जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं आहे.

जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली.

हे आहेत पाच मुद्दे -

  1. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली
  2. जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे
  3. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
  4. जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं
  5. त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत

Updated : 2021-04-05T15:09:24+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top