Home > Political > जेंव्हा मी तुला आपलं कुटुंब सांभाळतांना पाहते... अदिती तटकरे

जेंव्हा मी तुला आपलं कुटुंब सांभाळतांना पाहते... अदिती तटकरे

आई नावाच्या विश्वासाठी महिला आणि बालकल्याणमंत्री अदिती तटकरेंनी एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. अदिती आपल्या आईबद्दल काय म्हणतात जाणून घ्या!

जेंव्हा मी तुला आपलं कुटुंब सांभाळतांना पाहते... अदिती तटकरे
X

आई कोणतीही असो ती आईचं आसते. आई म्हणजे प्रेरणा, मार्गदर्शन आणि आपल्या जीवनाचा आधार असतो म्हणूनचं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जात. ते अगदी खरं आहे, आई नावाच्या विश्वासाठी महिला आणि बालकल्याणमंत्री अदिती तटकरेंनी एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. अदिती आपल्या आईबद्दल काय म्हणतात जाणून घ्या!

अदिती तटकरे म्हणतात " राजकारणात भूषावलेली सगळीच पद फार छोटी वाटतात. जेंव्हा मी तुला आपलं कुटुंब सांभाळतांना पाहते, आजपर्यन्त तुला आम्हा सर्व कुटुंबासाठी दिवस रात्र राबतांना मी पाहिलंय,तटकरे कुटुंबाशी जोडल्यापासून तुला क्वचितच माहेरचे वयक्तिक आयुष्य जगतांना मी पाहिलं आहे. परंतु तरीही माहेरची तसेच सासरची सर्वच लोकांशी तुझी नाळ प्रेमाने जुळली, आमच्या आनंदातच तू नेहमी स्वताचा अनंद शोधत राहिलीस आपल्या कुटुंबाची खरी तटबंदी तूच आहेस.
आमच्या कार्यक्षेत्रात जे काही जोडलेले संबंध आहेत, त्याला जिव्हाळ्याच्या भाग्याने घट्ट हे तू बांधले आहेस. आणि हीच खरी यशाची चावी आहे, आज माझे जे काही चांगले आहे ते तुझ्यामुळे आहे, आणि जे काही वाईट असेल ते माझ्यामुळे आहे असं अदिती तटकरे म्हणतात.

Updated : 20 April 2024 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top