Top
Home > Political > कोकेनसह अटक केलेल्या पामेला म्हणतात, विजयवर्गीय यांच्या माणसाने फसवलं

कोकेनसह अटक केलेल्या पामेला म्हणतात, "विजयवर्गीय यांच्या माणसाने फसवलं"

कोकेनसह अटक केलेल्या पामेला म्हणतात, विजयवर्गीय यांच्या माणसाने फसवलं
X

पश्चिम बंगालमध्ये 10 लाखांच्या 90 ग्रॅम कोकेनसह अटक केलेल्या भाजप युवा मोर्चाच्य़ा महासचिव पामेला गोस्वामी यांनी, आपल्याला भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्या जवळच्या माणसाने अडवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात विजयवर्गीय याचे निकटवर्तीय राकेश सिंह याचा हात असल्याचं पामेला यांनी सांगीतलं.

नेमकं प्रकरण काय?..

19 फेब्रुवारीला शुक्रवारी पामेला यांना पश्चिम बंगाल पोलीसांनी त्यांचे मित्र प्रबीर कुमार डे व पामेला यांचा खासगी सुरक्षा रक्षकासह अटक केली. त्यांच्यावर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. पामेला यांना २५ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पामेला यांच्या बॅगेत व कारमध्ये ९० ग्रॅम कोकेन होते. याची किंमत लाखो रुपये असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Updated : 22 Feb 2021 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top