Home > Political > बंगालच्या लोकांची ताकद पाहण्यासाठी तयार राहा तृणमुलचा भाजपला इशारा

बंगालच्या लोकांची ताकद पाहण्यासाठी तयार राहा तृणमुलचा भाजपला इशारा

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर "बंगालच्या लोकांची ताकद पाहण्यासाठी तयार राहा" असा इशारा तृणमुल कॉंग्रेसने भाजपला दिला आहे.

बंगालच्या लोकांची ताकद पाहण्यासाठी तयार राहा तृणमुलचा भाजपला इशारा
X

पश्चिम बंगालच्या मुख्यीमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्यात त्यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे. तृणमुल कॉंग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी एक फोटो ट्विटर वर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या डाव्या पायाला प्लास्टर केलेलं दिसून येत आहे. त्यांनी या फॉटोला भाजपच्या लोकांना उद्देशून 2 मे ला बंगालच्या लोकांची ताकद पाहण्यासाठी तयार राहा.

असं म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मध्ये विधानसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या असताना हल्ला करण्यात आला होता.. यामध्ये विविध माध्यमांवर दाखवण्यात आलेल्या दृश्यामध्ये ममता बॅनर्जी यांना त्यांचे सुरक्षा रक्षक गाडीत उचलून ठेवत असल्याचं दिसून येत आहे.

ममता यांच्या पायाला जखम झाली आहे. ममता बॅनर्जी यांचा आज नंदीग्राम येथे दौरा होता. मात्र, या हल्ल्यानंतर त्या कोलकाता येथे परत आल्या आहेत. ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचेच पुर्वीचे सहकारी राहिलेले आणि भाजप मध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी निवडणूक लढवणार आहेत.

Updated : 11 March 2021 6:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top