Home > Political > जात-पात विसरून स्रीयांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे - संध्याताई सव्वालाखे

जात-पात विसरून स्रीयांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे - संध्याताई सव्वालाखे

जात-पात विसरून स्रीयांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे - संध्याताई सव्वालाखे
X

महिलांवरील वाढते अत्याचार ही देशातील सर्वात मोठी समस्या निर्माण होत चालली आहे. सर्व स्तरावरील महिलांना आता पुरुषांच्या विकृत मानसिकतेला सामोरे जावे लागत असून भाजपा सरकार मध्ये सध्या महिलांचा अनादर होताना दिसत आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशअध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी केले. त्या आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी आयोजित 'सच्चाई आपके द्वार ' या पुस्तक प्रकाशन समारेभाच्या कार्यक्रमावेळी बोलत होत्या.



यापुढे बोलताना सव्वालाखे म्हणाल्या की, काँग्रेस हा स्रीयांचा आदर आणि सन्मान करणारा पक्ष आहे. हाच विचार जनमाणसांच्या मनामनात आपल्याला पोहचवायचा आहे यासाठी आता सर्व महिलांनी एकत्रित येण्याची नितांत गरज आहे. सध्याची परिस्थिती पाहता देशात स्री अत्याचाराची एक मालिकाच सुरू आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आता आपण महिलांनी आवाज उठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जातपात धर्म हा भेदभाव विसरून स्रीयांच्या सुरक्षिततेसाठी तिच्या सक्षमीकरणासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. सध्या देशातील वाढती महागाई, भ्रष्टाचार, अशा सर्व समस्यांचा खरा चेहरा 'सच्चाई आपके द्वार ' या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्षाची विचारधाराच देशाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



त्यांनातर महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कांग्रेसने भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात् मनपा समोर आंदोलन केले.



यावेळी व्यासपीठावर पुण्याचे काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, पुणे शहर मा महापौर कमल व्यवहारे, महिला अध्यक्ष सोनाली मारणे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस संगिता तिवारी,सिमा सावंत,काँग्रेस च्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Updated : 30 Sep 2021 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top