Home > Political > आम्हाला कोणाला जागा दाखवायची गरज नाही त्यांना जनता जागा दाखवेल : किशोरी पेडणेकर

आम्हाला कोणाला जागा दाखवायची गरज नाही त्यांना जनता जागा दाखवेल : किशोरी पेडणेकर

आम्हाला कोणाला जागा दाखवायची गरज नाही त्यांना जनता जागा दाखवेल : किशोरी पेडणेकर
X

मी विरोधात बोलणार नाही वर्तमानात बोलणार आहे. निकाल काय लागला त्यावर विरोधात बोलणार नाही विरोधात कसा गेला यावर बोलणार आहे आणि त्याची स्क्रिप्ट ठरली आहे हे विरोधकांनी विसरू नये. आणि आम्हाला कोणाला जागा दाखवण्याची गरज नसून जनता त्यांना जागा दाखवेल अशी टीका मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज नागपूर मध्ये केली.

स्त्री संवाद यात्रेनिमित्त आज पेडणेकर या नागपूर मध्ये आले असता विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जागा वाटपा बद्दल प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या की, जागा वाटपाबद्दल निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतात त्यांचा फार्मूला ठरेल तेव्हा तो समोर येईल जागावाटप पेक्षा जे जागेवर आहे त्यांना कशी संधी द्यायची जे थांबले त्यांच्यासोबत संवाद करून त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीला पॉवर देण्याचं काम करणार आहोत.

स्त्री शक्ती संवाद विषय बोलताना पेडणेकर म्हणाले की, महिलांचा महिलांचा जोश पाहून तुम्हाला या यात्रेची तयारी दिसलीच असेल स्त्री संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात येत असून महाराष्ट्रात सध्या भूतळाचे प्रश्न काढले जात आहेत पण हा वर्तमान आहे या वर्तमानाला शोधायला भविष्याला घडवायला हा स्त्रीशक्तीचा संवाद ठेवला आहे असे त्या म्हणाल्या.

Updated : 16 Jan 2024 1:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top