Home > Political > अमरावती जिल्हा बँक निवडणूक, यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

अमरावती जिल्हा बँक निवडणूक, यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

अमरावती   जिल्हा बँक निवडणूक, यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क
X

अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्यातील राजकीय नेत्याचे लक्ष लागलं आहे, कारण या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू हे आमने सामने आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. सहकार पॅनल या निवडणुकीत विजयी होईल असा दावाही त्यांनी केला आहे. जिल्हा बँकेवर काँग्रेसची सलग 10 वर्ष सत्ता आहे, ही सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके आणि राज्यमंत्री बच्चू कडू एकत्र आले आहेत.

Updated : 4 Oct 2021 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top