Home > Political > महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रोखला बालविवाह

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रोखला बालविवाह

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रोखला बालविवाह
X

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्रातील 14 वर्षीय मुलीचा विवाह गुजरात राज्यातील जोलवा येथे थांबवण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यासाठी नियोजन करून गुजरातमध्ये नेण्यात आले होते. 1098 या क्रमांकावर दिलेल्या तक्रारीवरून तसेच महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्यानी तात्काळ पावलं उचलल्यामुळे दोन्ही राज्यातील बाल संरक्षण यंत्रणा कामाला लागल्या. त्यामुळे रविवारी पार पाडणारा बाल विवाह थांबवण्यात यश आले आहे. या प्रतिबंधात्मक कार्यवाहीत बुलडाणा दैनिक लोकमंथनने देखील मोलाची भूमिका बजावली. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार संबंधित मुलीच्या पुनर्वसनासाठी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बुलडाणाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकार्यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाला आदेश दिले आहेत.

असा रोखला बालविवाह

विदर्भातील एका मुलीचा सुरत येथील एका मुलासोबत बालविवाह होत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना मिळाली. या मुलीला विदर्भातून गुजरात मध्ये नेलं असल्याचं कळलं. त्या माहितीनुसार महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई सुरू केली. अधिकाऱ्यांनी भरूच येथील पोलीसांना या बालविवाहाची माहिती दिली, आणि कसंही करून हा बालविवाह रोखण्याची विनंती केली. 
वेळ कमी होता. एका मुलीचं बालपण वाचवण्यासाठी सर्व पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अखेर हा बालविवाह रोखला गेला.

बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. कोवळ्या मुला-मुलींचं आयुष्य बरबाद करू नका. त्यांना सक्षम होऊ द्या. लग्नाची घाई जीवघेणीही ठरू शकते. बेकायदेशीर कृत्याला बळू पडू नका. मुलींना चांगलं शिक्षण द्या, त्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ द्या. राज्यात लॉकडाऊनचा फ़ायदा घेत अनेक बालविवाह झाले, सजग नागरिक आणि अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन शेकडो बालविवाह थांबवले. ही एक चळवळ आहे. सर्वांनी प्रयत्न केले तरच बालविवाहाच्या अनिष्ठ चालीतून समाजाची सुटका होईल. सामाजिक दडपणामुळे गप्प बसू नका.

Updated : 30 March 2021 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top