Home > Political > #Governorgoback विद्या चव्हाण यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

#Governorgoback विद्या चव्हाण यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

#Governorgoback विद्या चव्हाण यांचा राज्यपालांवर हल्लाबोल
X

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत असताना "महाराष्ट्रात मी लोकांना सांगत असतो की मुंबई ठाण्यातून गुजराती आणि मारवाडी निघाले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही" असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.राज्यपालांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवरून टीका होत आहे.

यावर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली आहे."राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले ते सावित्रीबाई फुले यांच्या विषयी चुकीचे विधान केले आहे.मुंबईबद्दल चुकीचे विधान करून मुंबईतील कष्टकरी माणसांचा अपमान केला आहे .मुंबईमध्ये फक्त मराठी माणूस राहत नाही तर अनेक लोक मुंबई मद्ये येतात.ते कष्ट करतात ,व्यवसाय करतात.पण राज्यपाल भगतसिंग कोशारी म्हणतात तसे या लोकांनी मुंबईतून जाऊन दाखवावे. हा व्यवसाय मराठी माणूस केल्याशिवाय राहणार नाही ,अस स्पष्ट मत विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले आहे

राज्यपालांच्या या विधानानंतर सध्याची परिस्थिती पाहता मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसं #gobackrajyapal हा ट्रेंड आणतील .त्याचबरोबर महाराष्ट्राला त्यांची गरज नाही असं वक्तव्य विद्या चव्हाण यांनी केले आहे.राज्यपाल भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करतात असे स्पष्ट मतही त्यांनी मांडले आहे .

Updated : 30 July 2022 10:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top