Home > Political > राम कदम यांना अटक केली तरच राजेश साप्तेंचा बळी घेणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल: विद्या चव्हाण

राम कदम यांना अटक केली तरच राजेश साप्तेंचा बळी घेणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल: विद्या चव्हाण

राम कदम यांना अटक केली तरच राजेश साप्तेंचा बळी घेणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल: विद्या चव्हाण
X

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. राजेश साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत, त्या लोकांनी गेली अनेक वर्षे सुमारे ४५ हजार कामगारांना वेठीस धरले असल्याचा आरोप माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केला आहे. तसेच भाजप आमदार राम कदम यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे, तरच खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल, असेही विद्या चव्हाण म्हणाल्यात.

नृत्य, ॲक्शन, म्युझिक, कॅमेरामन, फायटर अशा एकून २२ क्राफ्टची एक युनियन आहे. २०१२ साली ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती हे त्याचे चेअरमन होते. २०१५ सालापासून राम कदम या युनियनचे चेअरमन झाले. तेव्हापासून राकेश मौर्या, गंगेश्वर श्रीवास्तव, अम्रिश श्रीवास्तव, अशोक दुबे, बी.एन. तिवारी, दीपक श्रीवास्तव यांची गोरेगाव चित्रनगरी येथे दादागिरी सुरू झाली. या सगळ्या लोकांनी जवळजवळ ४५ हजार कलाक्षेत्रातील कामगारांना वेठीस धरले होते. हे लोक सेटवर जाऊन खंडणी वसूल करून कामगारांना धमकवत असल्याचा आरोप,चव्हाणा यांनी केला.




तसेच या लोकांवर अनेक गुन्हेदेखील दाखल असल्याचे विद्या चव्हाण म्हणाल्या. राम कदम यांनी वेळोवेळी आपलं राजकीय वजन वापरून या गुंडाना हाताशी धरून त्यांना वाचवले आहे. या सर्वांचे कायदेशीर सल्लागार हे किरीट सोमय्या असून चंद्रकांत पाटील यांनी या गुंडांची गुन्ह्याची प्रकरणे दाबून टाकण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात गृहखात्याचा गैरवापर केला असल्याचा गंभीर आरोप देखील विद्या चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राम कदम यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे, तरच खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल, असेही विद्या चव्हाण म्हणाल्यात.

Updated : 6 July 2021 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top