Home > Political > "पक्षात मोठं होण्यासाठी केलेला हा सर्व प्रकार" विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल

"पक्षात मोठं होण्यासाठी केलेला हा सर्व प्रकार" विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेवर कबुलीजबाब देत असताना चित्रा वाघ यांनी दबाव टाकला. कोणतंही पद मिळालं की वेगवेगळे हातकांडे वापरून आपण मोठे होऊ शकतो याचा अनुभव घेतल्यानंतर पक्षात मोठे होण्यासाठी चित्रा वाघ यांनी केलेला हा सर्व प्रकार आल्याची टीका करत विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल..

पक्षात मोठं होण्यासाठी केलेला हा सर्व प्रकार विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल
X

कोणतंही पद मिळालं की वेगवेगळे हातकांडे वापरून आपण मोठे होऊ शकतो याचा अनुभव घेतल्यानंतर पक्षात मोठे होण्यासाठी चित्रा वाघ यांनी केलेला हा सर्व प्रकार आल्याची टीका जेष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.

शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचीक यांच्यावर एका मुलीशी लग्नाचे आम्हीच देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात केली होती. हे प्रकरण भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आता या प्रकरणात राष्ट्रवादीच्या सर्व महिला नेत्या एकवटल्या आहेत.

काल विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. " रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने कबुली दिली आहे की, तिला कशाप्रकारे त्रास दिला गेला आहे, कबुलीजबाब देत असताना त्यात काय असलं पाहिजे यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. पक्षात एखादं पद मिळालं की आपण कसे मोठे होतो. काय काय हातखंडे केले तर आपण पटकन वरती जाऊ शकतो याचा त्यांनी अनुभव घेतल्यानंतर तेच हातकंडे वापरून त्या सर्वत्र तोच प्रकार करत आल्याची टीका जेष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.

महिलावर अत्याचार होत असेल तर कोणीही त्याचा समर्थन करू नये. राजकीय फायद्यासाठी पीडित मुलीचा वापर करून घेतला. कुचिक प्रकरणात पीडितेवर दबाव टाकून वाघ यांना पाहिजे तशी तक्रार नोंदवून घेतल्याचा आरोप पीडितीने केला असल्याचं चव्हाण म्हणाल्या.

नक्की काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचीक यांच्यावर एका मुलीशी लग्नाचे आम्हीच देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात केली होती. हे प्रकरण भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

पिडीतेने नेमके काय आरोप केले?

"मला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं गेलं होतं. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं होतं. याशिवाय मी जर कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकू", अशी धमकी दिल्याचे आरोप पिडीतेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर लावले आहेत.

याशिवाय महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं. तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहेत. विशिष्ट यंत्रणेचा वापर करून माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज केले गेले आहेत, असंही या तरुणीनं सांगितलं. याशिवाय सोमवारी भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने एक पत्र आणून मला दिलं आहे. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येत आहे, असंही ती म्हणाली. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी माझ्यावर भाजपकडून दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पीडित तरूणीने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रा वाघ काय म्हणाल्या?

रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले….खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात Feb पासून एकटी लढणार्या या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात तिने बोलताचं सगळे एकत्र तिच्या मदतीसाठी आलेत याचा आनंद वाटला..

मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे…मला राज्यातल्या मायमाऊलींना सांगायचंय काही अडचण असेल संपर्क करा जी मदत आम्हाला करता येईल ती आम्ही नक्की करू व करत राहू ….

Updated : 15 April 2022 4:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top