Home > Political > पत्राचाळ प्रकरणात राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांचा काय आहे संबंध?

पत्राचाळ प्रकरणात राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांचा काय आहे संबंध?

पत्राचाळ प्रकरणात राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांचा काय आहे संबंध?
X

EDच्या १० अधिकाऱ्यांचे पथक रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत सीआरपीएफच्या जवानांचा तगडा बंदोबस्त होता. ईडीचे काही अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरातील कागदपत्रेही तपासली आहेत.पत्राचाळ घोटाळा प्रकरणात काही आर्थिक व्यवहार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून झाले होते. त्यामुळे ईडीने वर्षा राऊत यांनाही काही प्रश्न विचारल्याची माहिती आहे.

संजय राऊत यांना इडली ताब्यात घेतले आहे दरम्यान संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचाही पत्राचाळ प्रकरणात समावेश आहे असे म्हटले जाते.

पत्राचाळ प्रकरण काय आहे ?त्याच्याशी वर्षा राऊत यांचा संबंध कसा?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी मे.गुरु आशिष कन्स्ट्रक्शन ही प्रवीण राऊत यांची कंपनी पुढे आली होती . राकेश वाधवान सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे या कामासाठी म्हाडा सोबत कंत्राट झाले होते. पण प्रवीण राऊत त्यांच्या कंपनीने म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच नऊ विकास कामांना 901 कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. या सगळ्या मधून या कंपनीने 138 कोटी रुपये जमा केले होते म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं होतं त्यामुळे ईडीकडून ही चौकशी सुरू होती.

Updated : 31 July 2022 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top