Home > Political > वंसंत मोरे यांचा रुपाली पाटील ठोंबरे यांना टोला?

वंसंत मोरे यांचा रुपाली पाटील ठोंबरे यांना टोला?

"जेव्हा एखाद्या पक्षाचा नेता राजीनामा देतो ना तेव्हा नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असतो" वसंत मोरे यांचा तर हा टोला काही दिवसांपूर्वी मनसे सोडून गेलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांना तर नाही नाही ना?

वंसंत मोरे यांचा रुपाली पाटील ठोंबरे यांना टोला?
X

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. रुपाली ठोंबरे यांनी मनसे सोडल्यानंतर मानसेमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ही चर्चा थांबते न थांबते तोपर्यंत मनसे मध्ये कार्यकर्ते नाराज आहेत का? अशी चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्याचे कारण आहे राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात झालेले भाषण.

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray Speech) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून वक्तव्य केले होते. त्यामध्ये जर सरकारने मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर हिंदूंनी त्यापेक्षा मोठ्या आवाजात मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठन करण्याचे आवाहन केले होते. त्यावरून मनसेतील खदखद समोर आली आहे. पक्षाच्या काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर पुणे शहराचे वसंत मोरे यांनी आमच्या मतदारसंघात आम्ही मशिदींसमोर हनुमानचालिसा पठन करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राज ठाकरे यांच्या भुमिकेशी विसंगत भुमिका घेतली.

आता वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहेत. तर मोरे यांनी भेटीचे फोटो ट्वीट करत किल्ल्याचे बुरूज ढासळले तर किल्ला ढासळायला वेळ लागत नसल्याचे सांगत राज ठाकरेंना इशारा दिला आहे.

वसंत मोरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासळायला लागले ना की किल्ला पडायला वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. पण जेव्हा एखादा शाखाअध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना, तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. भेट घेलेल्या पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव असं म्हंटल आहे.

वंसंत मोरे यांचा रुपाली ठोंबरे यांना टोला?

"जेव्हा एखाद्या पक्षाचा नेता राजीनामा देतो ना तेव्हा नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असतो" असं जे मोरे यांनी म्हंटल आहे. तर हा टोला नक्की कोणाला आहे? काही दिवसांपूर्वी मनसे सोडून गेलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांना तर हा टोला नाही ना? अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. रुपाली ठोंबरे यांनी मनसे सोडल्यानंतर मानसेमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. वसंत मोरे आणि रुपाली ठोंबरे यांचे जवळचे संबंध आहेत. रुपाली ठोंबरे वसंत मोरे यांना भाऊ मानतात. मात्र आता वसंत मोरे यांच्या ट्विट मूळ पुन्हा एकदा रुपाली पाटील ठोंबरे यांची चर्चा आहे.

Updated : 7 April 2022 5:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top