Home > Political > चोरावर मोर करायला संजय राऊत सक्षम; उर्मिला मातोंडकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

चोरावर मोर करायला संजय राऊत सक्षम; उर्मिला मातोंडकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

चोरावर मोर करायला संजय राऊत सक्षम; उर्मिला मातोंडकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर
X

मुंबई: नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात राहिलेल्या फादर स्टॅन सामी यांच्या निधनामुळे संजय राऊत ( Sanjay Raut ) प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात, अशी टीका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh )यांना अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला ( Urmila Matondkar ) मातोंडकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच संजय राऊत ( Sanjay Raut ) हे चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत, असा खोचक टोलाही लगावला आहे.

भविष्यातील निवडणुका लक्षात घेत आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी शिवसेनेकडून राज्यभर शिव संपर्क अभियान उपक्रम राबवले जात आहे. उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar ) यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh) यांनी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्याबद्दल केलेल्या विधानांविषयी विचारण्यात आलं. असता, त्यावर बोलताना उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar ) म्हणाल्या, "संजय राऊत ( Sanjay Raut ) हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. त्यावर मी काय बोलू, ते रॉक स्टार आहेत," असं म्हणत उर्मिला ( Urmila Matondkar ) मातोंडकर यांनी वाघ यांच्यावर निशाणा साधला.

चित्रा वाघ ( Chitra Wagh) गेल्या काही दिवसांपासून विवध मुद्यांवरून संजय राऊत ( Sanjay Raut ) आणि ठेकार सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. फादर स्टॅन सामी यांच्या निधनानंतर त्यांनी संजय राऊत ( Sanjay Raut ) सामानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून वाघ यांनी ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.

Updated : 12 July 2021 2:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top