Home > Political > उर्मिला आणि कंगणा मध्ये व्हिडीओ वॉर

उर्मिला आणि कंगणा मध्ये व्हिडीओ वॉर

उर्मिला आणि कंगणा मध्ये व्हिडीओ वॉर
X

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर ने ऑफिस खरेदी केलं आहे. या संदर्भात काही माध्यमांनी वृत्त दिल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी अर्धवट माहितीच्या आधारे बातमी देणाऱ्या माध्यमांना चांगलेच ख़डे बोल सुनावले होते. या संदर्भात ट्विटर व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी अभिनेत्री कंगना राणावतला चॅलेंज देत जागा आणि वेळ सांग मी तिथं यायला तयार असल्याचं म्हटलं आहे.

https://twitter.com/UrmilaMatondkar/status/1345638520375791621

या व्हिडीओ बाबत बोलताना उर्मिला मातोंडकर यांनी काही माध्यमांनी चुकीची माहिती पसरवली, चुकीच्या बातम्या चालवल्या. लॉकडाऊनच्या काळात आपण अंधेरीच्या डी.एन. नगर भागातील आपला एक फ्लॅट विकला. त्याच पैशातून आपण हे कार्यालय खरेदी केलं आहे.

असं म्हणत त्यांनी गोदी मीडिया सह कंगना राणावतचा समाचार घेतला आहे.

त्यानंतर कंगनाने उर्मिला मातोंडकर चा थट्टा उडवणारा व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओ मध्ये उर्मिला ने विविध वृत्त वाहिन्यांना दिलेला मुलाखतीचे छोटे छोटे व्हिडीओ वापरण्यात आले आहेत. त्यामध्ये उर्मिला कंगणाची मिमिक्री करताना दिसत आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1345608335601516544

Updated : 4 Jan 2021 6:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top