Home > Political > उर्मिला मातोंडकरांच्या 'हातात' शिवसेनेचा 'धनुष्य'

उर्मिला मातोंडकरांच्या 'हातात' शिवसेनेचा 'धनुष्य'

उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

उर्मिला मातोंडकरांच्या हातात शिवसेनेचा धनुष्य
X

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राजकारणातली आपली दुसरी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहेत. उल्लेखनिय म्हणजे शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीच्या यादीत उर्मिला यांचं नाव राज्यपालांकडे दिलेलं आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ऑफर स्विकारली होती.

उर्मिला यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहे आणि उद्या त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Updated : 30 Nov 2020 7:15 AM GMT
Next Story
Share it
Top