Home > कोरोनाच्या संकटकाळात शिवसैनिकांमध्ये असंतोष का?

कोरोनाच्या संकटकाळात शिवसैनिकांमध्ये असंतोष का?

कोरोनाच्या संकटकाळात शिवसैनिकांमध्ये असंतोष का?
X

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्याने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. आरोग्य सेवकांचं कमी प्रमाण आणि रूग्णालयात झालेली रूग्णांची गर्दी यामुळे नवीन कोविड-19 रूग्णांना आरोग्य सेवा मिळताना अडचणी येत आहेत. अनेक रूग्णालयं फिरून झाल्यानंतर, फोनाफोनी केल्यानंतर रूग्णालयात प्रवेश मिळत आहे. रूग्णांची अशी अवस्था असताना केवळ सत्ता आहे म्हणून शांत बसावं लागत असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

हे ही वाचा..

मॅक्समहाराष्ट्र आणि मॅक्सवुमनच्या टीम ने मुंबईतल्या अनेक शिवसैनकांशी या मुद्दायवर संपर्क साधला असता शिवसैनिकांनी स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टर फिल्ड वर येण्याऐवजी व्हिडीयो कॉन्फरन्सने कामकाज बघत आहेत, तर रूग्णालयांच्या यादीची पुरेशी प्रसिद्धी केलेली नसल्याने रूग्ण इकडे-तिकडे फिरत आहेत. यामुळे ही कोरोनाचा प्रसार होण्याची भीती शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

सरकार काय काम करतंय याचे ग्राफिक्स आणि व्हिडीयो आम्हाला मोबाईल वर येतात, मात्र ग्राऊंड लेव्हल वर जर शिवसैनिकांची मदत घेतली तर अनावश्यक गर्दीला ही आळा बसू शकेल असं मत एका शिवसैनिकाने व्यक्त केलं.

मुस्लीम वस्त्यांचे अनेक व्हिडीयो मध्यंतरी व्हायरल झाले होते. काही राजकीय पक्ष राजकारणासाठी हे व्हिडीयो मुद्दाम व्हायरल करत आहेत. मात्र अनेक शिवसेना विभागप्रमुखांचं मुस्लीम वस्त्या तसंच नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यांना जर समन्वयाची जबाबदारी दिली तर पोलीसांचं बरंचसं काम हलकं होऊ शकेल, तसंच रूग्णालयांबाहेर जर आम्हाला सेवा करायची संधी दिली तर आम्ही नक्कीच आरोग्य सेवकांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करू असं मत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केलं आहे.

उध्दव ठाकरे चांगलं काम करतायत पण मुंबई अडचणीत असताना शिवसेना कामाला आली नाही, घरात बसून राहिली तर काय उपयोग. शिवसैनिक या अडचणीच्या काळात कामाला नाही आला, तर येती निवडणूकही शिवसेनाला जड जाईल. मात्र, आमचे नेते हल्ली शिवसैनिकांचं ऐकत नाहीत. ही पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही, असं मत एका जुन्या शिवसैनिकाने व्यक्त केलं आहे.

कोरोनामुळे घरात बसणं तसंच शारिरीक अंतर बाळगणं आवश्यक असलं तरी नाक्या नाक्यावरच्या शाखांमधून लोकांना मार्गदर्शन तसंच मदतीचं काम व्यवस्थितरित्या होऊ शकतं, एकनाथ शिंदेंसारखे नेते खिशातले पैसै खर्च करून लोकांना मदत करत आहेत, मात्र मुंबईच्या जीवावर मोठे झालेले अनेक आजीमाजी शिवसेना नगरसेवक आणि आमदार, खासदार खिशातून पैसे काढायला बघत नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांची भाषा आणि राहणीमान ही बदललेलं आहे, आता त्यांना सामान्य शिवसैनिक जवळचा वाटत नाही, अशी तक्रार ही एका शिवसैनिकाने केली आहे.

काही शिवसैना नेते मदतीचे फोटो काढून घ्यायला ही पुढे असतात. हे शिवसेनेचं कल्चर नाही. चमकोगिरी करणाऱ्या अशा लोकांमुळे सामान्य शिवसैनिक झाकोळला जात असल्याची खंत दादर मधल्या एका शिवसैनिकाने व्यक्त केली आहे.

Updated : 14 May 2020 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top