Home > Political > नांदेडच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड

नांदेडच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड

नांदेडच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड
X

नांदेडच्या 14 व्या महापौर म्हणून काँग्रेसच्या जयश्री निलेश पावडे यांची आज बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवड प्रक्रियेत 9 ऑक्टोबर रोजी जयश्री पावडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. आज निवडीची प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.

नांदेड महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. काँग्रेसने अडीच वर्षाच्या महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात 2 महापौर करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच्या महापौर मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत जयश्री निलेश पावडे यांची निवड झाली.

Updated : 13 Oct 2021 11:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top