Home > Political > Video : मुख्यमंत्र्यांना खालच्या भाषेत बोलणं महिलेला पडणार महागात..

Video : मुख्यमंत्र्यांना खालच्या भाषेत बोलणं महिलेला पडणार महागात..

Video : मुख्यमंत्र्यांना खालच्या भाषेत बोलणं महिलेला पडणार महागात..
X

कल्याण मध्ये आयोजित ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात एका महिला पदाधिकाऱ्याची जीभ घसरली. या पदाधिकारी महिलेने थेट व्यासपीठावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिव्यांची लाखोली वाहिली. मुंबईच्या विभाग संघटक राजुल पटेल असे या महिला पदाधिका-याचं नाव आहे. हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे शिवसेना एकनाथ शिंदे समर्थक महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून त्यांनी कल्याणचे डीसीपी सचीन गुंजाळ यांना निवेदन दिले आहे. राजुल पटेल व कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Updated : 3 March 2023 5:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top