Home > Political > '' काही यंत्रणांना कामाला...'' उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

'' काही यंत्रणांना कामाला...'' उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

 काही यंत्रणांना कामाला...  उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप
X

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता निवडणूक आयोगापुढेही सुरू झाला आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि दुसरीकडे निव़डणूक आयोगातील लढाई या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीवर आलेल्या नाशिकच्या शिवसैनिकांशी संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन तर केले पण शिंदे गटाच्या एका खेळीबाबतही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

निवडणूक आयोगाला आपल्यासोबत किती शिवसैनिक आहेत याची आकडेवारी सादर करायची आहे, त्यासाठी वेळ मिळाला आहे, पण शिंदे गटाने त्यांच्याकडे जास्त संख्या असावी यासाठी काही यंत्रणांना कामाला लावल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. माझ्याकडे फक्त शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आहे त्यापेक्षा दहापट जास्त संख्या आपल्याकडे असली पाहिजे असे त्यांनी शिवसैनिकांना बजावले आहे.

Updated : 8 Aug 2022 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top