Home > Political > उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचा कोणताही संबध नाही.. डॉ.नीलम गोऱ्हे यांच स्पष्टीकरण

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचा कोणताही संबध नाही.. डॉ.नीलम गोऱ्हे यांच स्पष्टीकरण

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचा कोणताही संबध नाही.. डॉ.नीलम गोऱ्हे यांच स्पष्टीकरण
X

शिंदे गटातील नेते आणि राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री १० ते १२ जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. याठिकाणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सभा घेतली होती. वाहतूकीचा कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. या सभेच्या काही कालावधी नंतर जमावाने उदय सामंत यांच्या गाडी हल्ला केला. यामध्ये सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली असून पुण्यातील शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला. यावेळी हल्लेखोरांनी "गद्दार-गद्दार" अशी घोषणाबाजीही केली. यावर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचे उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपलं मत समाजमाध्यमांवर व्यक्त केलं आहे.

पुण्यात कात्रज याठिकाणी शिवसेनेची सभा होती . या घटनेवर आता नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या.. जमाव जात असताना उदय सांमत यांच्या गाडीवर हात आपटले गेले आणि त्यांच्या गाडीची काच फोडली. या घटणेचा पोलीस तपास करत आहे. सभेला अनेक प्रकारची लोक होती त्यामुळे वाहतूक बराच काळ अडली होती. सिंग्नल जवळ गाडी थांबल्यानंतर जे लोक त्या वाहतूकीत होते त्यामधील अनेक लोक बघे, नागरीक, सामान्य लोक आणि शिवसैनिक सुध्दा होते. त्यामुळे पोलीस तपासातून समोर येईल त्या मधुन अनेक गोष्टी स्पष्ट होतील. परंतू या घटनेचा " शिवसेनेशी कोणताही संबध नाही"

तुम्ही जर सभेतील भाषणं पाहीलत तर त्यात कुठेही "चिथावणीखोर" भाषणं कुठेच केल नव्हत. "आदित्य ठाकरे यांनी तुम्ही निवडनुकीला सामोरे जा" अशा प्रकारचे आवाहन केलं होत. "ती सुपारी होती त्यांना जे काय म्हणायचं आहे त्यांचे त्यां पूरावे द्यावे" अशा प्रकारचा टोला ही गोऱ्हे यांनी लगावला. त्या पुढे म्हणाल्या सामंत हे "दहा ते बारा ग्रस्ती पोलीस आणि सुरक्षारक्षकांच्या गराड्यात होते." त्यांना जास्तीत जास्त संरक्षण मिळालं आहे. या घटनेच्या शिवसेचं काही कारण नसताना जबाबदारी ढकलण हे योग्य नाही. जे काही वस्तुस्थीत समोर येईल त्याला निश्चतपणे सामोरे जाव लागेल अशी खोचक प्रतिक्रीया नीलम गोऱ्हे यांनी दिली.


Updated : 3 Aug 2022 10:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top