Home > Political > केतकीच्या शाहीफेकलेल्या ब्लॉऊजवर त्रिशूळाच डिजाईन

केतकीच्या शाहीफेकलेल्या ब्लॉऊजवर त्रिशूळाच डिजाईन

केतकीच्या शाहीफेकलेल्या ब्लॉऊजवर त्रिशूळाच डिजाईन
X


मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या काही ना काही वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहीली आहे. ती नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. केतकी च्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने तिच्या फेसबूक अकाऊंटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी केतकीला अटक करण्यात आली होती. याच अटकेदरम्यान केतकीवर शाहीफेक झाली होती.

केतकीच्या या अटकेत शाही फेकल्यानंतर तिच्या ब्लॉऊजचा शाहीरंग जात नव्हता. तिने त्यावर भन्नाट आयडीया शोधली. आणि त्या साडीवरच्या ब्लॉऊज तिने एक डिजाईन तयार केले. केतकीने तिच्या सोशल मिडीयावर एक व्हि़डीओ शेअर केला आहे त्यामध्ये ती त्या ब्लॉऊजला रंग भरतना दिसत आहे. जेव्हा शाईफेक करण्यात आली तेव्हाचे फोटो व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहेत. त्यानंतर शाईमुळे खराब झालेला ब्लाऊज ती दाखवत आहे. केतकीने ब्लाऊजवर जिथे शाई दिसत आहे तिथे रंग भरले आहेत. इतकंच नव्हे तर या ब्लाऊजवर तिने त्रिशूळ काढलं आहे.

याचा व्हिडीशो शेअर करत "हर हर महादेव" असं कॅप्शन केतकी दिलं आहे. केतकीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी केतकीचे कौतुक केलं आहे. अति सुंदर, तू अगदी हुशार आणि ते त्यांचे दिवस होते आज आपले दिवस आहेत अशा प्रतिक्रीया नेटकऱ्यांकडून केतकीला मिळत आहेत.


Updated : 2022-08-04T15:03:15+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top