Home > Political > 'बंगालमध्ये फक्त 30 जागा जिंकून दाखवा' ममता बॅनर्जी यांचं भाजपला खुलं आव्हान

'बंगालमध्ये फक्त 30 जागा जिंकून दाखवा' ममता बॅनर्जी यांचं भाजपला खुलं आव्हान

बंगालमध्ये फक्त 30 जागा जिंकून दाखवा ममता बॅनर्जी यांचं भाजपला खुलं आव्हान
X

पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये मंगळवारी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी पदयात्रा काढली आणि नंतर एका सभेला संबोधित केले. ममता यांनी भाजपला आव्हान दिले आहे की, भाजपने बंगालमध्ये 30 जागा जिंकून दाखवाव्यात आणि नंतर 294 चे स्वप्न पाहावे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. ज्या बोलपूरमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रोड शो घेऊन 5 वर्षात 'सोनार बांग्ला' बनवण्याचा दावा केला होता, तर ममता बॅनर्जींनी पदयात्रा काढली.

ममता बनर्जी म्हणाल्या की भाजपवाले दर आठवड्याला फाइव स्टारमधलं अन्न खातात आणि आदिवासींसोबत जेवत असल्याचे दाखवतात. आम्ही 365 दिवस गुरुदेव रवींद्र नाथ टैगोरांच्या सोबत आहोत, मात्र भाजप दर दिवशी खोटे व्हिडीओ पसरवून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे.

बिरभूमच्या बोलपूरमध्ये ममता यांनी बंगालची संस्कृती नष्ट करण्याचे षड्यंत्र रचला जात असल्याचे सांगत भाजपवर हल्ला चढवला. भाजपने हिंसाचार आणि फूट पाडणारे राजकारण थांबवावे, असेही त्या म्हणाल्या. तसेच, जे लोक महात्मा गांधी आणि देशातील महान व्यक्तींचा आदर करू शकत नाहीत, ते 'सोनार बांग्ला' बनवण्याच्या गोष्टी करतात, असेही त्या म्हणाल्या.

Updated : 31 Dec 2020 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top