Home > Political > "तुम्ही साहसी नाही भित्रे आहात" महुआ मोईत्रा लोकसभेत गरजल्या..

"तुम्ही साहसी नाही भित्रे आहात" महुआ मोईत्रा लोकसभेत गरजल्या..

तुम्ही साहसी नाही भित्रे आहात महुआ मोईत्रा लोकसभेत गरजल्या..
X

आक्रमक भाषणासाठी प्रसिध्द असलेल्या तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. केंद्र सरकार भित्रे असल्याचं सांगत त्यांनी सीएए-एनआरसीवरुन सरकारनं घातलेला गोंधळ, घसरलेली अर्थव्यवस्था आणि ढासळत्या न्यायालयीन आणि प्रसारमाध्यमांच्या व्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर कोरडे ओढले.

आपल्या भाषणात महुआ मोईत्रा म्हणाल्या की, "केंद्र सरकारनं नेताजींचा वारसा पळवण्याचा आणि तो स्वतःच्या धाडसाच्या अरुंद कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला. काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता, असत्य यांनाच 'साहस' म्हणतात. पण तुम्ही साहसी नाही भित्रे आहात."

भाजपचे खासदार त्यांच्या भाषणात व्यत्यय आणत असताना त्यांनी आक्रमक भाषण सुरुच ठेवले. शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करुन सरकार लोकशाहीच्या तत्वांना मुठमाती देत असल्याचा आरोप खा. मोईत्रा यांनी केला.


Updated : 10 Feb 2021 2:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top