Home > Political > वानखेडे कुटुंबीयांनी घेतली भाजपा नेते किरीट सोमैय्यांची भेट..

वानखेडे कुटुंबीयांनी घेतली भाजपा नेते किरीट सोमैय्यांची भेट..

वानखेडे कुटुंबीयांनी घेतली भाजपा नेते किरीट सोमैय्यांची भेट..
X

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, याप्रकरणातील पंच असलेल्या किरण गोसावीच्या बॉडीगार्डनेही समीर वानखडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. त्यावर्ज भाजप नेत्यांनी समीर वानखेडेंच्या बाजुने राज्य सरकारपुढे प्रश्न उपस्थित केले. त्यातच, आता वानखेडे कुटुंबीयांनी भाजपा नेते किरीट सोमैय्यांची भेट घेतली आहे.

आर्यन खान ड्रग्जप्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले आहे. एकीकडे आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात झाला आहे. तर, दुसरीकडे वानखेडे विरुद्ध मलिक यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वानखेडे कुटुंबीय संतप्त झाले असून बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत सर्वच आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर, आज भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांची भेटही घेतली. समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडेकर, वडिल ज्ञानदेव वानखेडे आणि बहिणी यास्मीन वानखेडे यांनी किरीट सोमय्यांशी चर्चा केली.

Updated : 29 Oct 2021 7:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top