Home > Political > मनसेत मोठे बदल होणार?

मनसेत मोठे बदल होणार?

मनसेत मोठे बदल होणार?
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता येऊ घातलेल्या आगामी महानगर पालिका व नगर पालिकांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सूरी केली आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी उद्या जाहीर केली जाणार आहे. तसं पाहिलं तर मुंबई महानगरपालिका व त्यासोबत इतर अन्य पाच महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू करत कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसेने देखील निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. येऊ घातलेल्या या निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार का? की मनसे स्वावबळावर ही निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या भाजप-मनसे युतीच्या सुद्धा चर्चा सुरू आहेत.

अस आतांना महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी उद्या जाहीर केली जाणार आहे. ही कार्यकारिणी राजगड मध्यवर्ती कार्यालय दादर येथे होणार असून यामध्ये पद वाटप देखील केले जाणार आहे.

Updated : 8 July 2022 1:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top