Home > Political > भावाकडून बहिणीने शिवसेनेचं कार्यालय घेतले परत...

भावाकडून बहिणीने शिवसेनेचं कार्यालय घेतले परत...

भावाकडून बहिणीने शिवसेनेचं कार्यालय घेतले परत...
X

पाचोरा - भडगाव विधानसभा चे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नावाचे फलक खाली उतरवले गेले असून, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नावाचे फलक लागले आहे.

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना त्यांचं शिवतीर्थ शिवसेना कार्यालय खाली करावं लागलं आहे. किशोर पाटील यांच्या बहिण वैशाली सूर्यवंशी यांची ती खाजगी प्रॉपर्टी आहे. वैशाली सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला होता त्याचबरोबर मुंबई येथे कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. येत्या नऊ ऑगस्टला आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढणार आहे यामुळे वैशाली सूर्यवंशी या निष्ठा यात्रेच्या तयारीला लागले आहे. भाऊ शिंदे गटात तर बहीण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून यामुळे पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.Updated : 7 Aug 2022 1:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top