मला फोनवरून धमकी देणारा व्यक्ती एकेकाळी पडळकरांच्या गाडीचा चालक होता: सक्षणा सलगर
X
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन आला असून,"तुझी इज्जत लुटतो" अशी धमकी फोनवरून देण्यात आली आहे. याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील टोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेला हा तरुण एकेकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा चालक होता, असा आरोप सक्षणा सलगर यांनी मॅक्स वुमनला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
दोन दिवसांपूर्वी सलगर यांनी ट्विट करत म्हंटलं होत की,'मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 * या नंबरवरून फोन कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे, असे तो सांगत होता, असं सलगर यांनी ट्विट केलं होतं, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपीला अटक केलं आहे.
यावर बोलताना, सक्षणा सलगर म्हणाल्यात की, पडळकर यांना फक्त शरद पवार यांच्यावर बोलण्यासाठी नियुक्ती केलं आहे का? असा प्रश्न पडतो. ते धनगर समाजाच्या प्रश्नावर काही बोलत नाही. मी माझे मत मांडले म्हणून त्यांचे कार्यकर्ते मला फोन करून धमकी देतात. पण याला मी घाबरणारी नाही, असंही सलगर म्हणाल्या.